पुणे। पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित डॉ. प्रमोद मुळ्ये स्मृती करंडक पुणे जिल्हा मानांकन अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत शहरांतून विविध वयोगटात एकुण 474 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने पीवायसी क्लबच्या हॉलमध्ये 21 ते 26 ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा होत आहे.
पीवायसी हिंदू जिमखानाचे अध्यक्ष कुमार ताम्हाणे, क्लबचे मानद सचिव सारंग लागु आणि टेबल टेनिस विभागाचे सचिव तन्मय आगाशे यांनी सांगितले की, स्वर्गीय डॉ. प्रमोद मुळ्ये यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यामध्ये पृथा व्हर्टीकर, स्वप्नाली नारळे, धनश्री पवार, रुचिता दारवाटकर, तनया अभ्यंकर, संतोष वक्राडकर, रजत कदम, प्रणव घोळकर, उपेंद्र लिमये, ओंकार जोग हे अव्वल मानांकित खेळाडू झुंजणार आहेत.
तसेच, सर्वोत्कृष्ट खेळाडूला करंडक देण्यात येणार आहे. तसेच, ही स्पर्धा 11,13,15,17,17,19 वर्षांखालील मुले व मुलींच्या गटात, तर खुला पुरुष व महिला गट, प्रौढ गट, प्रौढ दुहेरी गट अशा गटात होणार आहे. यांत मोहिल ठाकूर, दिया शिंदे, श्रेयश माणकेश्वर, तनया अभ्यंकर, प्रणव घोळकर, रुचिता दारवटकर, पृथा वर्टीकर,ओंकार जोग, स्वप्नाली नरळे, उपेंद्र मुळ्ये,हरीश साळवी,प्रथम मानांकन देण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी संयोजन समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये तन्मय आगाशे, राहुल पाठक, अविनाश जोशी, दिपेश अभ्यंकर, कपिल खरे यांचा समावेश आहे. स्पर्धेचे उदघाटन आज, 21 ऑगस्ट रोजी विद्या मुळ्ये यांच्या हस्ते होणार आहे.
गटवार मानांकन असे :
11 वर्षांखालील मुले: 1. मोहिल ठाकूर, 2. दर्शन कांदळकर, 3. शारंग गवळी, 4. जय कुंटे, 5. पुष्कर चक्रदेव, 6.नीरव मुळ्ये, 7.आयुष्मान चौधरी, 8.धैर्य शहा;
11 वर्षांखालील मुली: 1. दिया शिंदे, 2.श्रिणीका उमेकर, 3.शरण्या प्रधान, 4.नीरजा देशमुख
13 वर्षांखालील मुले: 1.श्रेयश माणकेश्वर, 2.शौरेन सोमण, 3.नील नवरे, 4.आदित्य सामंत, 5.स्वरूप बादलकर, 6.दर्शन कांदळकर, 7.निशाद लेले, 8.मोहिल ठाकूर;
13 वर्षांखालील मुली: 1. तनया अभ्यंकर, 2.साई कुलकर्णी, 3.पलक जेसवानी, 4.आद्या गावत्रे, 5.श्रेया गायकवाड, 6.मृदुला सुरवसे, 7.स्वरा मरघडे;
15वर्षांखालील मुले : 1.प्रणव घोळकर, 2.अर्णव झगडे, 3.रामानुज जाधव, 4.इशान खांडेकर, 5.शौरेन सोमण, 6.आराध्या पाटील, 7.दर्श भिडे, 8.श्रेयश माणकेश्वर;
15 वर्षांखालील मुली : 1.रुचिता दारवटकर, 2.जान्हवी फणसे, 3.तनया अभ्यंकर, 4.निधी भांडारकर, 5.सई कुलकर्णी, 6.पलक जेसवानी, 7.श्रिया शेलार, 8.आद्या गावत्रे;
17 वर्षांखालील मुले : 1.प्रणव घोळकर, 2.प्रणव खेडकर, 3.इशान खांडेकर, 4.वेदांग जोशी, 5.अर्णव झगडे, 6.रामानुज जाधव,7.आराध्या पाटील, 8.श्रेयश माणकेश्वर;
17 वर्षांखालील मुली : 1.पृथा वर्टीकर, 2.राधिका सकपाळ, 3.रुचिता दारवटकर, 4.जान्हवी फणसे, 5.आशिका शर्मा, 6.स्वरदा देसाई, 7.पृथा आचरेकर, 8.तनया अभ्यंकर;
19 वर्षांखालील मुले: 1.प्रणव घोळकर, 2.इशान खांडेकर, 3.भार्गव चक्रदेव, 4.आदित्य जोरी, 5.अर्णव झगडे, 6. नरेन इंदाणी, 7.वेदांग जोशी, 8.जय पेंडसे;
19 वर्षांखालील मुली: 1. पृथा वर्टीकर, 2.धनश्री पवार, 3.राधिका सकपाळ, 4.वैष्णवी देवगडे, 5.निधी भांडारकर, 6.आशिका शर्मा, 7.मयुरी ठोंबरे, 8. रुचिता दारवटकर;
पुरुष : 1.ओंकार जोग, 2.भार्गव चक्रदेव, 3.वैभव दहिभाते, 4.आरुष गलपल्ली, 5.रजत कदम, 6.अर्णव झगडे, 7.आदित्य जोरी, 8.जय पेंडसे;
महिला: 1.स्वप्नाली नरळे, 2.धनश्री पवार, 3.वैष्णवी देवगडे, 4.श्रुती गभणे, 5.राधिका सकपाळ, 6.पृथा वर्टीकर, 7.निधी भांडारकर, 8.अदिती सिन्हा;
प्रौढ गट: 40 आणि 50 च्या वर्षावरील गट: 1.उपेंद्र मुळ्ये, 2.संतोष वक्राडकर, 3.दीपेश अभ्यंकर, 4.अभिजीत मिठापल्ली;
60वर्षांवरील: 1.हरीश साळवी, 2.अविनाश जोशी, 3.अनिल निंबाळकर, 4.बापू काटदरे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीची नवी कोरी स्पोर्ट्स कार, किंमत आणि फिचर्स जाणून व्हाल थक्क
थायलंड पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुकांत कदमला दुहेरीत विजेतेपद, एकेरीत उपविजेता
दु:खद! भारतीय फुटबॉलला ‘सुवर्ण युग’ दाखवणारा दिग्गज हरपला, ‘बद्रू दा’ यांचे निधन