प्रत्येक खेळात वय ही गोष्ट कधीतरी येतेच आणि खेळाडूला त्या खेळामधून निवृत्ती घ्यावी लागते. लीग स्पर्धाही त्याला अपवाद नसतात. उलट लीग स्पर्धांची सर्व गणितेच खेळाडू, त्याच ग्लॅमर आणि त्याची कामगिरी यावर अवलंबून असत.
जर आपण आयपीएल पाहिलं तर त्यात अनेक दिग्गज क्रिकेटपटू खेळले. अगदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, शेन वॉर्न, रिकी पॉन्टिंग वगैरे. परंतु एका वयानंतर त्यांनी आयपीएलमध्ये खेळणं बंद करून विविध लीगमधील जबाबदाऱ्या पार पडायला सुरुवात केली.
असेच काही क्रिकेटपटू आहेत जे ह्या आयपीएलनंतर आपल्याला कदाचित पुढील आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाहीत. त्यातील प्रमुख पाच खेळाडू…
#४ झहीर खान
भारताच्या विश्वचषक विजेत्या संघातील वेगवान गोलंदाज झहीर खान ऑक्टोबर महिन्यात वयाची ३९ वर्षे पूर्ण करेल. नगरचा असलेल्या ह्या खेळाडूने आयपीएलमध्ये दिल्ली, मुंबई आणि बेंगलोरकडून खेळताना १०० सामनेही पूर्ण केले आहेत. त्यात त्याने १०२ बळी घेताना २७.२७ ची सरासरी राखली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने चांगली कामगिरी जरी केली असली तरी त्यांना प्ले-ऑफ मध्ये प्रवेश काही करता आला नाही.
#३ आशिष नेहरा
८८ सामन्यांत १०६ बळी. एका जबदस्त वेगवान गोलंदाजांचा जबदस्त बायोडेटा. ३८ वर्षीय नेहरा भारताकडून आजही क्रिकेट खेळताना आपण पाहतो. मुंबई, दिल्ली, पुणे,चेन्नई आणि हैद्राबाद अश्या विविध संघाकडून नेहरा ८८ सामने खेळलेला आहे. नेहरा एक फिट खेळाडू समजाला जातो. आता त्याचा फिटनेसच ठरवू शकतो कि महान गोलंदाज आयपीएल किंवा देश यांच्यासाठी किती काळ योगदान देऊ शकतो.
#२ मिशेल जॉन्सन
ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज असललेला जॉन्सन आयपीएल मध्ये ४६ सामने खेळाला आहे. त्यात त्याने मुंबई आणि पंजाब संघांकडून खेळताना ५४ बळीही मिळविले आहे. ३५ वर्षीय जॉन्सन या वयातही चांगली करत आहे. परंतु ह्या आयपीएलमध्ये त्याला विशेष छाप काही पाडता आली नाही. ३ सामन्यात त्याने फक्त २ बळी मिळविले आहे.
#१ शेन वॉटसन
ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू असलेला शेन वॉटसन हा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच आघाड्यांवर बाप खेळाडू. त्यामुळे तो आयपीएलमधील एक महत्वाचा खेळाडू. आयपीएलमध्ये तब्बल १०२ सामने त्याने राजस्थान आणि बेंगलोर संघांकडून खेळले आहे. त्यात त्याने २६२२ धावा करताना ८६ बळी देखील घेतले आहेत. परंतु ह्या वर्षीच्या बिग बॅश लीगपासून वॉटसन पूर्णपणे लयीत खेळताना दिसत नाही. ह्या आयपीएलमध्येही त्याला विशेष असा प्रभाव पाडता आला नाही. वॉटसन आता ३६ वयाचा झाल्यामुळे पुढील वर्षी तो आयपीएलमध्ये दुसरी कोणती जबाबदारी पार पडताना दिसू शकतो.