विशाखापट्टनम। आज(24 आॅक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने वनडेतील 37 वे शतक झळकावले आहे. त्याच्या या शतकाच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 321 धावा केल्या.
या सामन्यात विराटने 129 चेंडूत 13 चौकार आणि 4 षटकार मारताना नाबाद 157 धावांची खेळी केली. याबरोबरच विराटची वनडेमध्ये 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची ही चौथी वेळ ठरली.
https://www.facebook.com/MahaSports/photos/pb.360415570983382.-2207520000.1540387805./723958531295749/?type=3&theater
तो वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहितने 6 वेळा असा कारनामा केला आहे. यातील तीन वेळा तर त्याने द्विशतके केली आहेत.
तसेच दुसऱ्या क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने 5 वेळा 150 पेक्षा अधिक धावांचा टप्पा पार केला आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तानकडून वनडे क्रिकेटमध्ये खेळलेल्या 218 खेळाडूंना मिळून फक्त 4 वेळा 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा टप्पा पार केला गेला आहे.
वनडेमध्ये सर्वाधिक वेळा 150 पेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू:
6 – रोहित शर्मा
5 – सचिन तेंडुलकर / डेव्हिड वॉर्नर
4 – हाशिम अमला / ख्रिस गेल / सनथ जयसुर्या / विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या:
–विराट कोहली कर्णधार म्हणूनही ठरला हीट; कधीही विचार केला नाही असा विक्रम आता खिशात
–१० हजार धावा करणाऱ्या कोहलीचे हे आहेत १० खास पराक्रम
–कोहलीच कोहली; एबी डिव्हीलियर्स, सचिनचे विक्रम एका दमात मोडले