वनडे विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (3 नोव्हेंबर) अफगाणिस्तान संघाने नेदरलँड्सला 7 विकेट्स राखून पराभूत केले. 2023 विश्वचषक स्पर्धेतील सात सामन्यांमध्ये हा त्यांचा चौथा विजय होता. आधी गोलंदाज आणि नंतर फलंदाजांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर अफगाणिस्तानने हा विजय मिळवला आणि गुणातिलकेतील स्थानात सुधारना केली. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी या सामन्यात संघासाठी पुन्हा एकदा हिरो ठरला.
अफगाणिस्तनला या सामन्यात विजयासाठी 180 धावा हव्या होत्या. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला करणाऱ्या फलंदाजांनी संघासाठी महत्वपूर्ण भागीदारी केली आणि विजय मिळवून दिला. या क्रमांकावरील फलंदाजी दुसरे कोणी नसून कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी (Hashmatullah Shahidi) आणि रहमत शाह (Rahmat Shah) हे दोघेजण होते. दोघांनी अनुक्रमे 56* आणि 52 धावांची खेळी केली आणि नेदरलँड्सच्या पराभवाचे मुख्य कारण ठरले. दुसरीकडे कोणताच खेळाडू नेदरलँड्ससाठी मॅच विनर ठरू शकला नाही. हशमतुल्लाह शाहिदी या सामन्याआधी श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याविरुद्धही अशाच प्रकारे मॅच विनर ठरला होता. नेदरलँड्सप्रमाणाचे पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धची त्याने नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता.
गोलंदाजांमध्ये अफगाणिस्तानसाठी मोहम्मद नबी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या होत्या. यादरम्यान त्याने अवघ्या 3.10च्या इकॉनॉमी रेटने 28 धावा खर्च केल्या. नूर अहमद याने 2, तर मुजीब उर रहमान याने एक विकेट घेतली. नेदरलँड्ससाठी लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व आणि कोलीन एकरमन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला नेदरलँड्स संघ मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. 46.3 षटकांमध्ये 179 धावा करून नेदरलँड्स संघ सर्वबाद झाला. यात सीब्रँड एजेलब्रेच याने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. तसेच सलामीवीर मॅक्स ओडाउड याने 42 धावांची महत्वपूर्ण खेळी केली होती. मात्र, या दोघांव्यतिरिक्त एकही फलंदाज अपेक्षित खेळी करू शकला नाही. परिणामी नेदरलँड्स संघाला या सामन्यात मोठा पराभव मिळाला. दुसरीकडे अफगाणिस्तानने हा विजय मिळवून गुणतालिकेतील आपले स्थान भक्कम केले. उपांत्य सामन्याच्या स्पर्धेत अफगाणिस्तान अजूनही कायम आहे. नेदरलँड्स संघ मात्र उपांत्य सामन्याच्या स्पर्धेतून बाहेर पडला. अफगाणिस्तानने या विजयानंतर गुणतालिकेत पाचवा क्रमांक मिळवला असून पाकिस्तानला मागे टाकले आहेत. अशात पाकिस्तानला पुन्हा गुणतालिकेत झेप घेण्यासाठी शनिवारी (4 नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवावा लागेल. (4th victory in this World Cup for Afghanistan in match against Netherlands)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
नेदरलँड्स – वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडाउड, कॉलिन एकरमन, सीब्रँड एंजेलब्रेच, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन.
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इकराम अलीखिल, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, फझलहक फारूखी, नूर अहमद.
महत्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! ‘या’ तारखेला खेळाडूंवर पाडला जाणार पैशांचा पाऊस, आयपीएल लिलिवाची तारीख निश्चित
अफगाणी गोलंदाजांचे कमाल कमबॅक! गुणतालिकेतील पाचवा क्रमांक जवळपास निश्चित, कराव्या लागणार फक्त ‘इतक्या’ धावा