अहमदनगर पेरियार पँथर्स विरुद्ध नाशिक द्वारका डिफेंडर्स यांच्यात झालेला सामना विशेष होता. क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मधील हा 100 वा सामना ठरला. युवा कबड्डी सिरीज ने 25 व्या दिवशी यशस्वी 100 सामन्याचा टप्पा पार केला. अहमदनगर क्रमांक एकचा संघ तर नाशिक आठव्या क्रमांकाचा संघ असल्याने सामना एकतर्फी होणार असा वाटलं होतं मात्र नाशिक संघाने अहमदनगर संघाला चांगला प्रतिकार दिला.
सामन्याची सुरुवात तशी शांत झालेली. अहमदनगर संघाला पहिल्या 5 मिनिटा मध्ये जास्त गुण मिळवता आले नाहीत. मात्र त्यानंतर प्रफुल झवारे ने चपळाईने गुण टिपत नाशिक संघाला ऑल आऊट केलं. अहमदनगर संघाची बचावफळी सांघिक खेळ करताना दिसली. मध्यांतराला अहमदनगर संघाकडे 22-12 अशी आघाडी होती.
नाशिक संघाने दुसऱ्या हाफ मध्ये चांगला खेळ करत आपली पिछाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. नाशिक चा चढाईपटू ईश्वर पठाडे ने चांगले गुण मिळवले तर पकडीत अविनाश दोंड व शिवकुमार बोरगोडे ने चांगला पकडी करत सामन्यात चुरस निर्माण केली. मात्र प्रफुल झवारे च्या सुपर टेन खेळीने तसेच सौरस मैद व अजित पवार यांच्या अष्टपैलू खेळीने अहमदनगर संघाने 41-29 असा सामना जिंकला. अहमदनगर संघ क्रांतीज्योत महिला प्रतिष्ठान युवा कबड्डी सिरीज मध्ये दहा सामने जिंकणार पहिला संघ ठरला.
बेस्ट रेडर- प्रफुल झवारे, अहमदनगर पेरियार पँथर्स
बेस्ट डिफेंडर- शिवकुमार बोरगोडे, नाशिक द्वारका डिफेंडर्स
कबड्डी का कमाल- अजित पवार, अहमदनगर पेरियार पँथर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
वनडे विश्वचषकात रहाणेला संधी मिळणार? चौथ्या क्रमांकासाठी ठोकली दावेदारी
चार वर्षानंतर हैदराबादमध्ये खेळणार वॉर्नर! आकडेवारी पाहून सनरायझर्सलाच फुटेल घाम