आयपीएल २०२४ चा हा हंगाम आतापर्यंत धमाकेदार राहिला आहे. या हंगामात फलंदाजांचं वर्चस्व दिसलं असून अनेक मोठे विक्रम मोडीत निघाले आहेत. मात्र चालू हंगामात असे अनेक मोठे खेळाडू आहेत ज्यांना आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा पाच आयपीएल स्टार्सबद्दल सांगणार आहोत. यापैकी एकानं तर गेल्या हंगामात खोऱ्यानं धावा गोळा केल्या होत्या.
काइल मेयर्स – वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज काइल मेयर्स आयपीएल २०२४ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा भाग आहे. या मोसमात मेयर्सला आतापर्यंत एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही. गेल्या वर्षी मेयर्सनं लखनऊसाठी सलामी येत १३ सामन्यांत ३७९ धावा ठोकल्या होत्या.
ग्लेन फिलिप्स – न्यूझीलंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन फिलिप्स या हंगामात सनरायझर्स हैदराबादचा भाग आहे. मात्र हैदराबादनं फिलिप्सला अद्याप एकही संधी दिलेली नाही. गेल्या मोसमात त्यानं हैदराबादकडून पाच सामने खेळले होते.
मिचेल सँटनर – न्यूझीलंडसाठी मुख्य फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर आयपीएल २०२४ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा भाग आहे. सँटनरनं मागील हंगामात चेन्नईसाठी ३ सामने खेळले होते, परंतु या हंगामात त्याला एकही संधी देण्यात आलेली नाही.
नवदीप सैनी – टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीही या हंगामात आतापर्यंत बेंचवरच बसलेला आहे. राजस्थान रॉयल्सनं चालू हंगामात सैनीला एकदाही संधी दिलेली नाही. ३१ वर्षीय नवदीप सैनीनं भारतासाठी ११ टी२० सामने खेळले आहेत. मात्र तो २०२३ आणि २०२२ आयपीएलमध्ये फक्त २-२ सामने खेळला होता.
रहमानुल्ला गुरबाज – कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज रहमानउल्ला गुरबाज गेल्या हंगामात सलामीला फलंदाजी करताना दिसला होता. परंतु या हंगामात केकेआरनं त्याला अद्याप एकदाही संधी दिलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या –