Ranji Trophy 2024: आसामचा कर्णधार रियान पराग याने छत्तीसगडविरूद्ध केवळ 56 चेंडूत शतक करत ऐतिहासिक खेळी केली. या त्याच्या धडाकेबाज खेळीने रणजी ट्रॉफीची सूरूवात एकदम जबरदस्त झाली आहे. रियानची ही कामगिरी जबरदस्त आहेच, परंतू या आधीही अशाच काही जबरदस्त शतकीय खेळ्या खेळल्या गेल्या आहेत. त्याच फलंदाजांबद्दल आज या लेखात पाहणार आहोत.
रणजी इतिहासात सर्वात जलद शतक ठोकणारे फलंदाज-
1) रिषभ पंत –
भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज रिषभ पंत याने 2016-17 हंगामात झारखंडविरूद्ध ही कामगिरी केली होती. त्याने 48 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. या त्याच्या खेळीत तब्बल 13 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे या धावा त्याने संघाला फॉलो-ऑन भेटल्यानंतर केल्या होत्या.
2) रियान पराग –
आसामचा कर्णधार असलेल्या रियान पराग याने छत्तीसगडविरूद्ध 87 चेंडूत 155 धावा केल्या. यात 12 षटकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. त्याने आपले शतक केवळ 55 चेंडूत पूर्ण केले होते. त्याच्या या शतकीय खेळीच्या जोरावर आसाम संघाने सर्वबाद 254 धावा केल्या.
3) नमन ओझा –
यामध्ये तिसरा नंबर येतो तो माजी भारतीय यष्टीरक्षक नमन ओझा याचा, त्याने 2014-15 हंगामात कर्नाटकविरूद्ध केवळ 69 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. त्याच्या 81 चेंडूत 115 धावांच्या खेळीने मध्यप्रदेश संघाला हा सामना अनिर्णीत ठेवता आला होता.
4) एकलव्य द्वीवेदी –
उत्तर प्रदेशच्या या फलंदाजाने 2014-15 हंगामात रेल्वेविरूद्ध केवळ 72 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. यावेळी त्याने 73 चेंडूत 102 धावांच्या खेळी केली होती.
5) रिषभ पंत –
पाचव्या स्थानी पुन्हा रिषभ पंत याचेच नाव येते. त्याने झारखंडविरूद्धच्याच्या सामन्यात पहिल्या डावात 82 चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते. यात 9 चौकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. या सामन्यात त्याने तब्बल 21 षटकार मारले होते. विशेष म्हणजे याच सामन्यात ईशान किशन याने देखील 336 चेंडूत 273 धावा केल्या होत्या. (5 Centurions Fastest Centuries in Ranji Trophy History)
हेही वाचा
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी मालिका खेळण्याबाबत शमीचं मोठं विधान, म्हणाला, ‘मी माझ्याकडून पूर्ण…’
IND vs ENG: रोहित शर्माला घाबरला इंग्लंड संघ; डाॅन ब्रॅडमनशी केली जातेय तुलना, वाचा नक्की प्रकरण काय