इंग्लिश प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ म्हणजे चेल्सी. या संघात खूप मोठे खेळाडू आहेत. हे वलयांकित खेळाडू आपल्या संघासोबतच जोडलेले राहावे म्हणून या संघाला खूप मोठी रक्कम देखील मोजावी लागते. चेल्सीने त्यांच्या संघातील खेळाडूंना मिळणाऱ्या मानधना संबंधातील माहिती खुली केली आहे. या संघातील काही मुख्य खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनाची बेरीज केली तर इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये खेळणाऱ्या काही छोट्या संघाच्या उत्पनापेक्षा देखील जास्त आहे.
या माहितीमध्ये त्यांनी संघातील खेळाडू आणि संघाचे प्रशिक्षक यांचे मानधन आपल्या समोर ठेवले आहे. त्याच्या बद्दल आपण जाणून घेऊ.
#थिबाऊट कोर्टोईस- गोलकीपर
सध्या जगातील सर्वोत्तम गोलकीपरपैकी एक असणारा हा गोलकीपर कोर्टोईस याचे चेल्सी संघाच्या यशात खूप मोठे योगदान आहे. २५ वर्षीय या गोलकीपरला संघात घेण्यासाठी रिअल माद्रिद संघाने खूप प्रयन्त केला. पण हा खेळाडू या संघासोबतच जोडला राहिला. उंच, मजबूत आणि फुटबॉलला थोपवण्याच्या कलेमध्ये निपुण असणाऱ्या खेळाडूला चेल्सीकडून दर आठवड्याला १२० हजार युरो इतकी मोठी रक्कम मिळते.
#डेविड लुईझ- सेन्टर बॅक
ब्राझीलचा हा खेळाडू सध्याघडीतील सर्वोत्तम सेंटर बॅक पैकी एक आहे. त्याने जेव्हापासून व्यावसायीक फुटबॉलमध्ये प्रवेश केला आहे तेव्हा पासून त्याचा खेळ हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ब्राझील राष्ट्रीय संघासाठी खेळताना देखील त्याची कामगिरी उत्तम असते. डिफेन्स मध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या या खेळाडूसाठी चेल्सी संघ दर आठवड्याला १२० हजार युरो इतकी रक्कम मोजतो.
#आल्वोरो मोराटा- स्ट्रायकर
रिअल माद्रिदकडून विकत घेतलेले हा स्पॅनीश खेळाडू चेल्सीसाठी नंबर नऊ म्हणून खेळतो. त्याची या संघासाठीची कामगिरी पाहता तो खूप थोड्या कालावधीत येथे खूप लोकप्रिय झाला आहे. याच मोसमामध्ये चेल्सीसोबत जोडला गेलेला मोराटाला दर आठवड्याला चेल्सी संघाकडून १५५ हजार युरो मिळतात.
#सेस फॅब्रीगास – सेंट्रल मिडफिल्डर
आर्सेनल आणि बार्सेलोना या दिग्गज संघाकडून खेळताना देखील या खेळाडूने आपल्या कौशल्याने अनेकांना प्रभावित केलेले होते. मागील काही मोसमापासून हा स्पॅनिश खेळाडू चेल्सी संघाचा मुख्य मिडफिल्डर आहे. चेल्सी संघाच्या खेळाचा मुख्य सूत्रधार हाच खेळाडू असतो. या खेळाडूसाठी चेल्सी संघ १५६ हजार युरो दर आठवड्याला मोजतो.
#दियागो कोस्टा-स्ट्रायकर
स्पेनसाठी खळणारा हा खेळाडू चेल्सी संघाचा मुख्य भाग होता. परंतु प्रशिक्षक अँटोनियो कान्टे याच्यासोबत झालेल्या शाब्दीक वादापासून थोडा गर्तेत सापडला आहे. त्याचे चेल्सी संघातील स्थान देखील निश्चित नाही. परंतु त्याच्या उत्तम खेळावर कोणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही. या खेळाडूसाठी चेल्सीचा संघ दर आठवड्याला १८५ हजार युरो इतकी रक्कम मोजतो.
#इडन हझार्ड- स्ट्रायकर
चेल्सीसाठी खेळणारा बेल्जीयमचा हा खेळाडू सध्याच्या घडीला खेळत असणाऱ्या काही सर्वाधीक गुणवत्तापूर्ण खेळाडूमध्ये येतो. या खेळाडूची गती, त्याचे ड्रीब्लिंग करण्याचे कौशल्य खूप वाखाणण्याजोगे आहे. माद्रिद संघाचा या वर्षीचे हा खेळाडू मुख्य लक्ष होता पण त्याचा करार होऊ शकला नाही. या खेळाडूने चेल्सी संघासोबत राहण्याचेच पसंद केले. पुढील काही वर्षात हा खेळाडू रिअल माद्रिद संघासाठी खेळताना आपणाला दिसू शकतो. या खेळाडूसाठी चेल्सी दर आठवड्याला २०० हजार युरो इतकी रक्कम मोजतो.
#अँटोनियो कान्टे- प्रशिक्षक
अनपेक्षितरित्या चेल्सी संघातील सर्वात महागडी व्यक्ती त्यांचे प्रशिक्षक आहेत. इटलीचे अँटोनियो कान्टे हे फुटबॉल जगतातील खूप मोठे प्रशिक्षक आहेत. त्याच्या एखाद्या खेळाडूला समजून आणि विरोधी संघाला समजून घेत बनवल्या जाणाऱ्या रणनीतीची सारे फुटबॉल जग प्रशंसा करते. त्यामुळे त्यांच्यासाठी चेसीचा संघ दर आठवड्याला २१० हजार युरो इतकी रक्कम मोजतो.
एक हजार युरो म्हणजे ७७०६२ भारतीय रुपये. यावरून या खेळाडूंना किती रुपये मिळत असतील याचा अंदाज आपण लावू शकतो.