क्रिकेटप्रेमींना क्रिकेटबद्दलच्या छोट्या-छोट्या गोष्टी माहिती असतात. मग एखाद्या खेळाडूच्या कारकिर्दीतील आकडेवारींपासून ते त्याने नोंदवलेला एखादा अविस्मरणीय विक्रम, या सर्वांवरती त्यांचे लक्ष असते. जेवढी ओढ चाहत्यांना खेळाडूच्या मैदानावरील कामगिरीची असते. तेवढीच ओढ त्यांना खेळाडूच्या वैयक्तिक जिवनाविषयीची असते. मग क्रिकेटव्यतिरिक्त ते दुसरा कोणता व्यवसाय करतात का त्यांच्या लग्नाच्या, वडील बनण्याच्या, कुंटुंबाच्या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
अशाच एका गमतीशीर विषयाचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे. अनेक क्रिकेटपटू वडील असल्याचे आपल्याला माहित आहे. एमएस धोनी, सचिन तेंडुलकर, शिखर धवन असे अनेक भारतीय क्रिकेटपटू आणि बरेच परदेशी क्रिकेटपटूंही वडील आहेत. परंतु, कोणत्या क्रिकेटपटूला लग्नापुर्वीच मुलं झाल्याचे ऐकल्यास सर्वांना धक्का बसतो. पण असे काही क्रिकेटर्स आहेत, जे त्यांच्या लग्नाच्या आधीच बाप बनले होते.
तर जाणून घेऊया, त्या ५ क्रिकेटपटूंविषयी (5 Cricketers Who Became Father Before Marriage)
ख्रिस गेल
वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला सर्वजण ओळखतात. त्याने आजवर अनेक तूफानी खेळी करत आपल्या संघाला सामने जिंकून दिले आहेत. गेल जेवढा क्रिकेट मैदानावर आपल्या खेळीचा आनंद लुटत असतो. तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक जिवनाचाही आनंद लुटताना दिसत असतो. गेलला नताशा बेर्रिज नावाची पत्नी आहे आणि ते दोघे ब्लश या मुलीचे आई-वडिल आहेत. परंतु, चकित करणारी गोष्ट ही आहे की, गेलला त्याच्या लग्नापुर्वी ब्लश (मुलगी) झाली होती आणि नंतर नताशा आणि गेलने लग्न केले.
जो रुट
इंग्लंडचा महान फलंदाज आणि उपकर्णधार जो रुट याचा २०१६मध्ये कॅरी कोटरेल हिच्याशी साखरपुडा झाला होता. परंतु, पुढे एका वर्षातच म्हणजे जानेवारी २०१७मध्ये रुट एका मुलाचा वडील बनला. त्याचे नाव अल्फ्रेड विलियम रुट आहे. मुलगा झाल्यानंतर डिसेंबर २०१८मध्ये कॅरी आणि रुटने लग्न केले.
विनोद कांबळी
मास्टर ब्लास्टरचा जवळचा मित्र आणि भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हा लग्नापुर्वी वडील बनला होता. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव नोएला लेविस होते. परंतु, त्यांचा तलाक झाला. त्यानंतर कांबळीचे अफेअर हे फॅशन मॉडल आंद्रेया हॅविटसोबत चालू होते. एवढेच नाही तर, अफेअरदरम्यान आंद्रेयाला मुलगा झाला. म्हणून लगेच त्यांनी लग्न केले. त्यांच्या मुलाचे नाव जीजस क्रिस्टियानो आहे.
डेविड वॉर्नर
ऑस्ट्रेलियाचा फटकेबाज फलंदाज डेविड वॉर्नर याने एप्रिल २०१५मध्ये आपल्या प्रेयसी कॅंडिस वॉर्नरसोबत लग्न केले. होते. परंतु त्यांना लग्नापुर्वीच सप्टेंबर २०१४मध्ये एक मुलगी झाली होती. आता ते २ मुली आणि एका मुलाचे आई-वडिल आहेत.
हार्दिक पंड्या
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याने रविवारी (३१ मे) सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन आपल्या होणाऱ्या पत्नी नताशा स्टेनकोव्हिकचे प्रेगनंट असल्याचे फोटो शेअर केले आणि आम्ही लवकरच आई-वडील बनणार असल्याचे सांगितले. परंतु, अद्यापही त्यांचे लग्न झाले नसल्याचे वृत्त आहे. त्यांचा जानेवारी २०२०मध्ये साखरपुडा झाला आहे.
पॅट कमिन्स
या यादीत लवकरच ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू पॅट कमिन्स याचे नाव जोडले जाणार आहे. रविवारी (९ मे) जगभरात मदर्स डे साजरा केला गेला. याच खास दिवशी पॅट कमिन्सला त्याच्या होणाऱ्या पत्नीने गोड बातमी सांगितली आहे. त्याची होणारी पत्नी बेकी बॉस्टन हीने सोशल मीडियाद्वारे ही गोड बातमी सांगितली आहे. ती लवकरच आई होणार आहे. दोघांनी फेब्रुवारी २०२० मध्ये साखरपुडा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ भारतीय क्रिकेटपटूंचा थाटच न्यारा, कोट्याधीश नव्हे तर चक्क अब्जाधीशांच्या घरचे आहेत लाडके जावई
बलाढ्य मुंबई इंडियन्सला मिळणार ‘या’ धुरंधरांची साथ, मिड सिजनमध्ये होऊ शकतात ताफ्यात दाखल