-आशुतोष मसगोंडे
टेनिसमधील अत्यंत लोकप्रिय असलेल्या विम्बल्डन ग्रँन्ड स्लँम स्पर्धेत खेळण्याचे व तिथे विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न जगातील प्रत्येक टेनिसपटू बाळगुन असतो.
गेल्या काही वर्षांत भारतीय टेनिस रसिकांना विम्बल्डनमधील यशाचा आनंद लुटता आला आहे. खास करून दुहेरी व मिश्र दुहेरी या प्रकारात. यामध्ये महेश भूपती व लिएंडर पेस यांचे यश सोन्याहुन पिवळे आहे.
गेल्या दोन दशकात भारतीय टेनिसपटूंना एकेरी प्रकारात फारशी समाधानकारक कामगिरी करता आली नाही. पण सत्तर-एैंशीच्या दशकात रामनाथ कृष्णण, विजय अमृतराज आणि रमेश कृष्णण यांची कामगिरी निश्चितच समाधानकारक होती. मात्र विजेतेपद मिळवण्याइतपत पुरेशी नव्हती.
भारतीय टेनिसपटूंची विम्बल्डनमधील एकेरीतील पाच श्रेष्ठ कामगिरी
#१ रामनाथ कृष्णण (उपात्यं फेरी 1960)
भारताचे आजपर्यंतचे सर्वात यशस्वी टेनिसपटू रामनाथ कृष्णण यांनी 1960 च्या विंब्लडन स्पर्धेत उपात्यं फेरीपर्यंत धडक मारली होती. त्यांना उपात्यं सामन्यात मात्र त्यावेळचे नंबर एकचे टेनिसपटूं नील फ्रासर यांच्याकडून सरळ सेटमधे पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर एकही भारतीय विंब्लडनची उपात्यं फेरी गाठू शकला नाही.
भारताचे आजपर्यंतचे सर्वात यशस्वी टेनिसपटू रामनाथ कृष्णण यांनी 1960 च्या विंब्लडन स्पर्धेत उपात्यं फेरीपर्यंत धडक मारली होती. #Wimbledon pic.twitter.com/7tKTqOcABB
— Maha Sports (@Maha_Sports) June 29, 2017
#२ रामनाथ कृष्णण (1961 उपात्यं फेरी)
रामनाथ कृष्णण यांनीच 1961 साली सलग दुसर्या वेळेस विम्बल्डनच्या उपात्यं फेरीत प्रवेश केला. यावेळी त्यांचा खेळात कमालीची आक्रमकता व सुधारणा झाली होती.तसेच यावेळी स्पर्धेत गतवर्षी पेक्षा तुलनेने बलाढ्य होते.उपात्यं पूर्व सामन्यात आँस्ट्रेलियाचे महान टेनिसपटू राँय ईमरसन यांना धूळ चारत रामनाथ कृष्णण यांनी उपात्यं फेरीत आपले स्थान पक्के केले होते. मात्र उपात्यं फेरीत पुन्हा त्यांचा पदरी निराशाच आली. राँड लिव्हर यांच्याकडून सरळ सेटमधे ते पराभूत झाले.
रामनाथ कृष्णण यांनीच 1961 साली सलग दुसर्या वेळेस विम्बल्डनच्या उपात्यं फेरीत प्रवेश केला. #Wimbledon pic.twitter.com/g8uzUmejh3
— Maha Sports (@Maha_Sports) June 29, 2017
#३ विजय अमृतराज (1973 उपात्यं पूर्व फेरी)
एैंशीच्या दशकातील भारतीय टेनिसचा लोकप्रिय चेहरा विजय अमृतराज यांनी 1973 च्या विम्बल्डन स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपात्यं पूर्व फेरी गाठली होती. पाच सेट मधे झालेल्या सामन्यात त्यांनी जाँन कोक्स यांना कडवी झुंज दीली मात्र 3-2 अशा फरकाने अमृतराज यांनी सामना गमावला मात्र भारतीय टेनिस प्रेमींची मने त्यांनी जिंकली.
80च्या दशकातील भारतीय टेनिसचा लोकप्रिय चेहरा विजय अमृतराज यांनी 1973च्या #wimbledon स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपात्यंपूर्व फेरी गाठली होती. pic.twitter.com/jQzmWUMUFP
— Maha Sports (@Maha_Sports) June 29, 2017
#४ विजय अमृतराज (1981 उपात्यं पूर्व फेरी)
विजय अमृतराज यांनी 1981 मधे पुन्हा एकदा आपल्या दमदार प्रदर्शनाने दुसर्या वेळी विम्बल्डनची उपात्यं पूर्व फेरी गाठली होती. इथे त्यांची लढत अमेरिकेच्या जीमी कार्नर यांच्याशी झाली. सामन्याच्या सुरवातीला अमृतराज 2-0 ने पुढे होते मात्र पुढचे सलग तीन सेट जिंकून काँर्नर यांनी सामना आपल्या खिशात घातला. आधीच्या फेरीत भल्या भल्यांना पाणी पाजणाऱ्या अमृतराज यांचे आव्हान इथेच संपले.
विजय अमृतराज यांनी 1981 मधे पुन्हा एकदा आपल्या दमदार प्रदर्शनाने दुसर्या वेळी #Wimbledon ची उपात्यं पूर्व फेरी गाठली होती. pic.twitter.com/9Y8OSQpABS
— Maha Sports (@Maha_Sports) June 29, 2017
#५ रमेश कृष्णण(1986 उपात्यं पूर्व फेरी)
रमेश कृष्णण यांनी आपल्या वडीलांच्या पाऊलावर पाऊल टाकत विम्बल्डन खेळण्याचा मान मिळवला. मात्र विजय अमृतराज यांच्याप्रमाणे उपात्यं फेरी गाठण्यात ते अयशस्वी ठरले. स्लोबोडान वोजोनोवीक यांनी रमेश कृष्णण यांचा 3-2 अशा फरकाने पराभव केला. रमेश कृष्णण यांच्या या कामगिरीनंतर एकही भारतीय टेनिसपटूं उपात्यं पूर्व फेरी गाठू शकला नाही.
रमेश कृष्णण यांनी वडीलांच्या पाऊलावर पाऊल टाकत #Wimbledon खेळण्याचा मान मिळवला.मात्र यांच्याप्रमाणे उपात्यं फेरी गाठण्यात अयशस्वी ठरले. pic.twitter.com/IeyJJ1X4KH
— Maha Sports (@Maha_Sports) June 29, 2017
गेल्या काही वर्षांत भारतीय टेनिसपटूंनी त्यांचा कामगिरीचा आलेख सतत उंचावत ठेवला आहे. अलिकडच्या काळात भारतात वाढणारी टेनिसची लोकप्रियता,तसेच सातत्याने मिळणाऱ्या प्रशिक्षणाच्या सुविधा पाहता येत्या काही वर्षांत भारतामधून नक्कीच विम्बल्डन विजेते घडतील.