क्रिकेट आणि ग्लॅमर यांचे जुने कनेक्शन आहे. यावरून तुम्ही विचार करत असाल की क्रिकेटपटू आणि अभिनेत्री यांच्या प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत कि काय, पण तसे तसे नाही.
येथे आपण ग्लॅमरचा तडका क्रिकेट खेळाडूंच्या जीवनावर नव्हे तर क्रिकेटच्या मैदानावर लावणार आहोत. आपल्या सर्वांना माहित आहे की क्रिकेट आता खूप बदलले आहे. जवळपास प्रत्येक सामन्यानंतर किंवा सामन्यापुर्वी, बऱ्याच प्रकारचे शो होतं असतात. त्यामध्ये अतिशय सुंदर समालोचन करणाऱ्या महिला अँकर (commentators) दिसतात.
त्या महिला समलोचक या केवळ दिसायला सुंदर नसून त्यांच्या क्रिकेटचे चांगले ज्ञान असते. शिवाय एक चांगला कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्याची, तसेच माजी क्रिकेटपटूंशी संवाद साधण्याची जबरदस्त कौशल्य या अँकरकडे असतात. कार्यक्रमात एखाद्या वेळी तणावाचे वातावरण तयार झाले असेल, तर ते आपल्या भाषा कौशल्याच्या जोरावर हलके फुलके कऱण्याचे कामही या अँकर करतात.
तर, आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या काही सुंदर महिला अँकरविषयी सांगणार आहोत.
१. मयंती लँगर (Mayanti Langer)
मयंती लँगर भारतीय क्रिकेट होस्ट करणार्या महिला अँकरमध्ये नंबर १ ची अँकर आहे. तसेच सर्वाधिक फी घेणाऱ्या अँकरपैकी ती एक आहे असं देखील म्हणता येईल.
मयंती म्हणजे आयपीएलचा प्रसिद्ध चेहरा आहे. याशिवाय जेव्हापासून स्टार स्पोर्ट्सने भारतीय संघाचे सामने प्रसारित करण्याचे अधिकार विकत घेतले आहेत, तेव्हापासून मयंती सामन्यांच्या शोचे होस्टिंग करत आहे.
मयंती भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नी (Stuart Binny) याची पत्नी आहे. मयंतीने फिफा वर्ल्ड कप २०१० मध्ये पहिल्यांदा अँकरिंगद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. फुटबॉलनंतर तिने क्रिकेटमध्ये आपले करिअर सुरु केले. २०११ मध्ये विश्वचषका दरम्यान अँकरिंग करून मयंतीने बरीच प्रसिद्धी मिळविली होती.
https://www.instagram.com/p/BiwThogFUWJ/
२. मंदिरा बेदी (Mandira Bedi)
जेव्हा खेळातील महिला अँकरची चर्चा होते तेव्हा मंदिरा बेदी यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मंदिरा खूपच सुंदर आहेच परंतु एक हुशार अँकर आहेत. असे असले तरीही क्रिकेटमधील काही गोष्टी माहित नसल्याने त्यांना बर्याचदा त्रास सहन करावा लागला. तसे, मंदिरा तिच्या होस्टिंगबरोबरच ड्रेसिंगसाठी अधिक प्रसिद्ध आहे.
त्यांनी २००९ मध्ये आयपीएलचे होस्टिंग केले होते, त्यानंतर आयपीएल सामन्यांचे कव्हरेजही ब्रिटीश वाहिनीसाठी सादर केले गेले होते. २००९ पूर्वी, मंदिराने २००३ आणि २००७ मधील आयसीसी क्रिकेट विश्वचषक त्याचबरोबर २००४ आणि २००६ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे होस्टिंग केले होते.
https://www.instagram.com/p/CAWtXRbAT5H/
३. मेल मॅकलॉघलिन (Mel McLaughlin)
ऑस्ट्रेलियाच्या सुंदर स्पोर्ट्स महिला अँकर मेल मॅकलॉघलिनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ऑस्ट्रेलियाच्या सिडनी येथे १९७९ मध्ये जन्मलेल्या मेल मॅकलॉघलिनने तिचे बालपण तिथेच घालवले. मेलचे वडील ब्रिटिश होते आणि ते मँचेस्टर युनायटेडचे चाहते होते. या कारणांमुळे, मेल मॅकलॉघलिनन मँचेस्टर युनायटेडची बॅग घेऊन शाळेत जायची.
मेल मॅकलॉघलिनने नेटवर्क टेन (Network 10) आणि फॉक्स स्पोर्ट्स (Fox Sports) सारख्या क्रीडा चॅनेलसाठी काम केले आहे.
यासह मॅकलॉघलिनने ऑस्ट्रेलियाची टी-20 लीग बिग बॅशचे होस्टिंग केले आहे. मेल मॅकलॉघलिनने किक ऑफ, इंडियन सुपर लीग सारख्या अनेक फुटबॉल शोचे होस्टिंग देखील केले आहे.
https://www.instagram.com/p/9DYY-OARWK/
४. लॉरा मॅकगोल्डिक (Laura McGoldrick)
न्यूझीलंडचा शानदार फलंदाज मार्टिन गप्टिलची पत्नी लॉरा मॅकगोल्डिक ही एक अँकर, रिपोर्टर आणि स्काय स्पोर्ट्स चॅनलची प्रसिद्ध रेडिओ जॉकी आहे. लॉराने ‘द क्रिकेट शो’, ‘होल्डन गोल्फ वर्ल्ड’, ‘एनझेड हेराल्ड फोकस’ यासारख्या अनेक मोठ्या कार्यक्रमांना होस्ट केले आहे.
गेल्या वर्षी इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेदरम्यान लॉरा ही तिचा नवरा मार्टिन गप्टिलची मुलाखत घेण्यासाठी देखील गेली होती, दोघांचेही ते फोटो खूप व्हायरल झाले होते.
https://www.instagram.com/p/BKDf8eejoSd/
५. अंबरीना सरजीन (Ambrina Sarjeen)
मॉडेल, अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट अंबरीना सरजीन बांगलादेश प्रीमियर लीगची सर्वाधिक लोकप्रिय अँकर आहे.
#sher-e-bangla cricket stadium #BPL2016 pic.twitter.com/nFYPGs77fG
— Ambrina Sarjeen (@ambrina_sarjeen) December 9, 2016
अंबरिन सरजेननी एनटीव्ही, आरटीव्ही आणि देश टीव्ही सारख्या बर्याच बांगलादेशी टीव्ही चॅनल्समध्ये काम केले आहे. २०१७ मध्ये, तिने कॅनडाच्या तौसिफ अहसन चौधरीशी लग्न केले. ते मूळचे बांगलादेशातील रहिवासी आहेत.