क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात शून्यावर बाद होणं, हे प्रत्येक खेळाडूंसाठी निराशाजनक गोष्ट असते. आंतरराष्ट्रीय वनडेमध्ये सर्वात जास्त शून्यावर बाद होणाऱ्या खेळाडूबद्दल बोललं, तर श्रीलंकेच्या जयसूर्या(Sanath Jayasuriya) यांचं नाव समोर येत. तो 34 वेळा शून्यावर बाद झाला आहे.
तर त्या व्यतिरिक्त काही असेही फलंदाज आहेत की ज्यांना सलग ४-४ वनडे सामन्यांत आपलं खात उघडता आलं नाही. जर आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये बघितलं तर वेस्टइंडिजच्या गस लोगी(,Gas Logi), इंग्लंड क्रेग व्हाइट (Craig White), झिम्बाब्वे हेनरी ओलोंगा(Henri Olonga) तर श्रीलंकेच्या लसीथ मलिंगा आणि प्रमोद विक्रमसिंघे यांची नावे येतात, ज्यांना सलग ४ सामन्यात भोपळाही फोडता आला नाही.
आपण आजच्या या लेखात असे भारतीय फलंदाज पाहणार आहोत, जे सलग ३ सामन्यात शुन्यावर बाद झालेत.
१ – सचिन तेंडुलकर (३वेळा)
क्रिकेट विश्वात शतकांच शतक करणारा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(Sachin Tendulkar) याच्या नावे अनेक एक नकोसा विक्रम आहे. 1994 मध्ये सचिन लागोपाठ तीन वनडे सामन्यांत शून्यावर बाद झाला होता.
श्रीलंकेविरुद्ध सप्टेंबरमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील अंतिम सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये वेस्टइंडिज विरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर पुढच्या सामन्यात सचिनने ८ धावा केल्या होत्या.
२ – अनिल कुंबळे (३ वेळा)
भारतीय संघाचा माजी महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे(Anil Kumble) याच्या नावावरही वनडेमध्ये हा विक्रम आहे. मे 1996 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्यांना आपलं खातं उघडता आलं नव्हतं, त्यानंतर सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील सहाव्या सामन्यातही तो शून्यावर बाद झाला होता.
३ झहीर खान (३वेळा)
भारतीय संघाचा माजी महान वेगवान गोलंदाज झहीर खान(Zahir Khan) याच्या नावावरही हा आगळा वेगळा विक्रम आहे. नोव्हेंबर 2003 मध्ये खेळल्या गेलेल्या त्रिकोणीय वनडे मालिकेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंतिम सामन्यात तो शून्यावर बाद झाला. तर मार्च 2004 मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत त्याला आपलं खातं उघडता आलं नव्हतं.
४ – इशांत शर्मा (३वेळा)
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा(Ishant Sharma) याच्या नावावरही हा विक्रम नोंदविला गेला आहे. ऑगस्ट 2010 मध्ये झालेल्या त्रिकोणीय मालिकेतील श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात तो शून्यावर बाद झाला. त्यानंतर जून 2011 मध्ये झालेल्या वनडे मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यात तो आपलं खातं उघडू शकला नाही.
५ – जसप्रीत बुमराह (३वेळा)
भारतीय संघाचा यॉर्कर किंग बुमराह(Jasprit Bumrah) यालाही सलग तीन वनडे सामन्यात धावांच खातं उघडता आलं नव्हतं. 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात तो शून्यावर बाद झाला. तर 2018 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध तर मार्च 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात खातं उघडण्यात तो अपयशी ठरला.