मागील काही महिन्यांपासून बीसीसीआयने खेळांडूच्या फिटनेयच्या बाबतीत अनेक कठोर निर्णय केले आहेत. त्याचा फटकाही काही खेळाडूंना बसला आहे.
बीसीसीआय प्रत्येक मालिकेआधी खेळाडूंची फिटनेस तपासण्यासाठी असलेली यो-यो घेत असते. यात अपयशी ठरलेल्या खेळाडूंना संघातील आपले स्थान गमवावे लागले. मग यात तो खेळाडू कितीही मोठा असला तरी त्याला ही यो-यो टेस्ट पास होणे गरजेचे आहे.
11 जूनलाही फिटनेसच्या कारणावरुनच मोहम्मद शमीला अफगाणिस्तान विरुद्ध 14 जून ते 18 जून दरम्यान होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघातून स्थान गमवावे लागले आहे. त्याचबरोबर संजू सॅमसनलाही इंग्लंड दौऱ्यावर जाणऱ्या भारतीय ‘अ’ संघातून बाहेर पडावे लागले आहे.
या 5 खेळाडूंना बसला आहे यो-याे टेस्टचा फटका:
मोहम्मद शमी: भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची याआधी अफगाणिस्तान विरुद्धच्या कसोटीसीठी भारतीय संघात निवड झाली होती.
परंतू शमी बंगळूरूमधील राष्ट्रीय क्रिकेट आकादमीमध्ये 9 जूनला झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने त्याला संघातून आपले स्थान गमवावे लागले आहे. त्याच्या ऐवजी दिल्लीच्या नवदिप सैनीची निवड करण्यात आली आहे.
संजू सॅमसन: भारताचा उदयोन्मुख यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला इंग्लंड दौऱ्यावर जात असलेल्या भारतीय ‘अ’ संघातून 11 जूनला बाहेर पडावे लागले. तोही 8 जूनला झालेल्या यो-यो टेस्टमध्ये अनुउत्तीर्ण झाला.
2018 आयपीयल आणि विजय हजारे चषकात चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला भारतीय ‘अ’ संघात स्थान मिळाले होते. परंतू फिटनेस टेस्टमध्ये कमी पडल्याने त्याला संघातील स्थान गमवावे लागले.
वाॅशिंगटन सुंदर: तमिळनाडूचा युवा अष्टपैलू वाॅशिंगटन सुंदरलाही यो-यो टेस्टमध्ये अपयशी ठरल्याने फटका बसला आहे. त्याने 2017 मध्ये आयपीएलमध्ये पुण्याकडून खेळताना तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती.
त्यामुळे त्याला 2017 मध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता होती परंतू तो फिटनेस टेस्ट उत्तीर्ण होऊ शकला नाही.
मात्र त्यानंतर त्याने यो-यो टेस्ट यशस्वीपणे पार केली.
युवराज सिंग: भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगही यो-यो टेस्टमध्ये अपयशी झाला आहे. यो-यो टेस्टमध्ये अपयशी होणारा तो पहिला क्रिकेटपटू होता.
ज्यावेळी आॅक्टोबर 2017 मध्ये भारतीय संघ आॅस्ट्रेलिया विरुद्ध मर्यादित षटकांची मालिका खेळत होता, त्यावेळी युवराज यो-यो टेस्टमध्ये अनुउत्तीर्ण ठरला होता.
त्यानंतर काही महिन्यांनी त्याने ही फिटनेस टेस्ट यशस्वीपणे पार केली. मात्र त्याला अजूनही भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.
सुरेश रैना: भारताचा आक्रमक फलंदाज सुरेश रैनालाही फिटनेस टेस्टमध्ये अपयशी झाल्याचा फटका बसला. त्याला हा फटका 2017 मध्ये भारतात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेआधी बसला.
त्यातच आधीच त्याला भारतीय संघातील स्थान गमवावे लागले होते. त्यामुळे त्याला यो-यो टेस्ट महत्त्वाची होती.
पण त्यानंतर त्याने ही टेस्ट यशस्वी पार करत दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी जवळ जवळ एक वर्षाने भारतीय संघात स्थान मिळवले.
तसेच त्याची पुढील महिन्यात आयरलँड आणि इंग्लंड दौऱ्यात होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
–गौतम गंभीरने आजपर्यंत एवढा ‘गंभीर’ आरोप कधीच केला नसेल!
–यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे काय रे भाऊ?
–भारतीय गोलंदाजामुळेच भारतीय संघ येणार कसोटी सामन्यात अडचणीत!