भारतीय क्रिकेटच्या इतिसाहात काही उत्कृष्ट रेकाॅर्ड बनून गेले आहेत, तर काही लाजिरवाणे रेकाॅर्ड देखील भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर आहेत, जे आजपर्यंत कायम आहेत. भारताचे असे 5 महान फलंदाज आहेत जे त्यांच्या वनडे कारकिर्दीतील पदार्पण सामन्यातच शून्यावर बाद झाले होते. या फलंदाजांच्या वनडे कारकिर्दीची सुरूवात खराब झाली असली, तरी त्यांनी पुढे महान कामगिरी केली. या बातमीद्वारे आपण या 5 फलंदाजांबद्दल जाणून घेऊया.
1) सचिन तेंडुलकर- सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) (18 डिसेंबर 1989) रोजी गुजरानवाला येथे पाकिस्तानविरूद्ध वनडेत पदार्पण केले. तेंडुलकर त्याच्या वनडे कारकिर्दीतील पदार्पण सामन्यातच तो शून्यावर बाद झाला होता. या सामन्यात तेंडुलकर 5व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता आणि तो खाते न उघडताच तंबूत परतला. पाकिस्तानविरूद्धच्या या सामन्यात भारताचा 7 धावांनी पराभव झाला होता.
एकदिवसीय पदार्पणात सचिन तेंडुलकर शून्यावर बाद झाला असला, तरी नंतर तो गोलंदाजांसाठी घातक फलंदाज ठरला. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 18,426 धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकावली आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 49 शतके आहेत.
2) महेंद्रसिंह धोनी- महेंद्रसिंग धोनीने (Mahendra Singh Dhoni) (23 डिसेंबर 2004) रोजी चित्तगाव येथे बांगलादेशविरूद्ध वनडे पदार्पण केले होते. धोनी त्याच्या वनडे कारकिर्दीतील पदार्पण सामन्यातच शून्यावर बाद झाला होता. या सामन्यात धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि तो खाते न उघडताच तंबूत परतला. पण भारताने हा सामना 11 धावांनी जिंकला. धोनीने 350 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,773 धावा केल्या आहेत.
3) सुरेश रैना- सुरेश रैनाने (Suresh Raina) (30 जुलै 2005) रोजी डबूनला येथे श्रीलंकेविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. रैना देखील त्याच्या वनडे कारकिर्दीतील पदार्पण सामन्यातच शून्यावर बाद झाला. रैनाला श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने एलबीडब्ल्यू बाद केले. रैना एकदिवसीय पदार्पणात शून्यावर बाद झाला असला तरी नंतर त्याने चमकदार कामगिरी केली. रैनाने 226 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5,615 धावा केल्या आहेत.
शिखर धवन- शिखर धवनने (Shikhar Dhawan) (20 ऑक्टोबर 2010) रोजी ऑस्ट्रेलियाविरूद्ध विशाखापट्टणम येथे वनडे पदार्पण केले. धवन त्याच्या वनडे कारकिर्दीतील पदार्पण सामन्यातच शून्यावर क्लीन बोल्ड झाला होता. भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा सामना 5 गडी राखून जिंकला होता. धवनने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 6,793 धावा केल्या आहेत.
कृष्णमाचारी श्रीकांत- माजी भारतीय कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांतने (Krishnamachari Srikkanth) (25 नोव्हेंबर 1981) रोजी अहमदाबाद येथे इंग्लंडविरूद्ध वनडे पदार्पण केले. क्रिस श्रीकांत देखील त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला. इंग्लंडविरूद्धच्या या एकदिवसीय सामन्यात भारताला 5 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. श्रीकांतने 146 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4,091 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी भारतापुढे झुकला पाकिस्तान, भारताच्या सामन्यांचे ठिकाण बदलणार?
‘हे’ 3 विस्फोटक फलंदाज मोडू शकतात ब्रायन लाराचा 400 धावांचा विश्वविक्रम?
माजी दिग्गज क्रिकेटपटूने पृथ्वी शाॅला लिहिले प्रेरणादायी पत्र…!