भारतीय संघ मायभूमीत 2023 साली विश्वचषक खेळणार आहे. 2019 साली झालेल्या पराभवातून धडा घेत भारतीय संघ एकाच जागेसाठी अनेक खेळाडू तयार ठेवत आहे. आगामी काळात भारतीय संघाला एका फिनिशरची गरज भासणार हे नक्की आहे. आपण या लेखात बघणार आहोत असे 5 युवा खेळाडू ज्यांना 2023 विश्वचषकापूर्वी भारतीय संघ आपले कौशल्य दाखवण्याची संधी देवू शकतो.
1)रियान पराग – आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळणार्या रियान परागने आपल्या आयपीएलमधील कामगिरीने दिग्गजांना आपले चाहते बनवले आहे. राजस्थान साठी त्याने बर्याच वेळेस उत्कृष्ट फिनिशरची भूमिका बजावली आहे. आयपीएल मध्ये केवळ 17 व्या वर्षी अर्धशतक झळकावत एक मोठा विक्रम रियान परागने आपल्या नावे केला होता. स्थानिक क्रिकेट मध्ये देखील परागने शानदार कामगिरी केलेली असून निश्चितच भारतीय संघासाठी देखील तो उत्तम कामगिरी करू शकतो.
2)शाहरुख खान – सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2021 मध्ये शानदार कामगिरी करत शाहरुख खानने संपूर्ण क्रिकेट वर्तुळाचे लक्ष आपल्याकडे वळवले होते. शाहरुखला आपल्या कामगिरीचे फळ मिळाले व आयपीएल 2021 मध्ये त्याला पंजाब किंग्जकडून खेळण्याची संधी मिळाली.या हंगामात शाहरुखने पंजाब किंग्ज साठी अनेक शानदार खेळ्या केल्या असून निश्चितच त्याला भारतीय संघ आगामी काळात संधी देवू शकतो.
3)दीपक हूडा – दीपक हूडा हा 2014 पासूनच आयपीएल मध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे. 2014 मधील मधील 19 वर्षांखालील विश्वचषकातही तो भारतीय संघाचा भाग होता. त्याने आयपीएलमध्ये अनेक शानदार खेळ्याही केलेल्या आहेत. भारतीय संघात 2017 च्या निदहास ट्रॉफी साठी हूडाची निवड झाली, परंतु दुर्दैवाने त्याला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र त्याचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होवू शकते.
4)अनुज रावत – उत्तराखंडचा युवा खेळाडू अनुज रावत हा आगामी काळात भारतीय संघासाठी एक उत्तम यष्टीरक्षक फलंदाज सिद्ध होऊ शकतो. 19 वर्षांखालील विश्वचषकात राहुल द्रविडने जेव्हा रावतला कर्णधार बनवलं तेव्हा त्याच्या गुणवत्तेचं प्रमाण सिद्ध झालं होत. अनुजला देखील भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5)चेझियन हरीनिशांत – सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चेझियन हरीनिशांत हा आपल्या खेळामुळे खूपच प्रसिद्ध झाला होता. त्याने यावर्षी तामिळनाडूकडून खेळताना 41 च्या सरासरीने 246 धावा केल्या होत्या. हरीनिशांतची फलंदाजी शैली खूप प्रभावी आहे आणि हार्दिक पांड्यानंतर त्याला एक मोठा फिनिशर म्हणूनही पाहिले जात आहे. जर सर्व काही ठीक झाले तर हा खेळाडू 2023 विश्वचषकात फिनिशरची भूमिका देखील बजावू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० वर्ल्डकपपूर्वी इंग्लंडच्या खेळाडूची निवृत्ती, केल्या आहेत बारा हजारपेक्षा जास्त धावा
आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत बांग्लादेशी खेळाडूंची मोठी झेप, यांना टाकले मागे
चाहत्यांच्या उत्साहाला येणार उधाण! या सामन्यात दिसणार १८ हजार प्रेक्षक