क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या प्रत्येक फलंदाजाच्या मनात असते की, आज आपण मोठी खेळी केल्याशिवाय मैदानाबाहेर पडायचे नाही. मग ती मोठी खेळी अर्धशतक असल्यास उत्तम. त्याहूनही अधिक शतक असल्यास तर अतिउत्तम ठरते. क्रिकेटच्या कोणत्याही स्वरुपामध्ये शतक मारणे सोपे नसते. क्रिकेटविश्वात अनेक असे दिग्गज फलंदाज आहेत, ज्यांनी आतापर्यंत क्रिकेटच्या तिन्ही स्वरुपात शतके मारली आहेत. यात रोहित शर्मासारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे.
वनडे क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, वरच्या फळीतील फलंदाजांना शतके ठोकण्याची पुरेशी संधी असते. तथापि, असे काही फलंदाज आहेत, ज्यांना या रूपात जास्त शतके करता आली नाहीत. तर काही फलंदाज असेही आहेत, ज्यांनी वनडेत शतक तर ठोकले. पण हे शतक करण्यासाठी त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त अवधी लागला. या लेखात अशाच 5 फलंदाजांची माहिती देण्यात आली आहे, ज्यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिले वनडे शतक मोठ्या वयात झळकावले आहे.
5. मोहिंदर अमरनाथ – 37 वर्ष 117 दिवस
भारताचे माजी दिग्गज फलंदाज मोहिंदर अमरनाथ यांनी आपल्या वयाच्या ३७व्या वर्षी (३७ वर्ष ११७ दिवस) आपले कारर्किदीतील पहिले वनडे शतक केले होते. १ जानेवारी १९८८ रोजी त्यांनी फरीदाबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध आपले पहिले वनडे शतक झळकावले होते. त्यांनी वनडे कारकीर्दीत फक्त 2 शतके मारली आहेत.
४. सुनील गावस्कर – 38 वर्ष 113 दिवस
एकेकाळी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३४ शतके ठोकण्याचा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. पण तुम्हाला एकून आश्चर्य वाटेल की याच सुनील गावस्कर यांनी वनडेमध्ये एकच शतक ठोकले आहे. तेही वयाच्या ३८ वर्ष ११३ व्या दिवशी. हे एकमात्र शकत त्यांनी ३१ ऑक्टोबर १९८७ रोजी न्यूझीलंडविरुद्ध मारले होते.
३. डेविड हेम्प- 38 वर्ष 149 दिवस
बरमुडा क्रिकेट संघाचे माजी सलामीवीर डेविड हेम्प यांनी 6 एप्रिल 2009 रोजी केनियाविरुद्ध पहिले वनडे शतक ठोकले होते. वयाच्या 38 वर्षे आणि 149 दिवसांत त्यांनी वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. हे शतक हे त्यांच्या वनडे कारकिर्दीतील एकमेव शतक आहे.
२. ज्योफ बॉयकाट- 39 वर्ष 51 दिवस
इंग्लंडचे माजी दिग्गज ज्योफ बॉयकॉट यांनी वयाच्या 39 व्या वर्षी आणि 51 दिवसांत वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. त्यांनी 11 डिसेंबर 1979 मध्ये सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे शतक केले होते.
१. खुर्रम खान- 43 वर्ष 162 दिवस
सर्वात जास्त वयात प्रथम वनडे शतक ठोकण्याचा विक्रम युएईच्या खुर्रम खानच्या नावावर आहे. वयाच्या 43 वर्षे आणि 162 दिवसांत त्याने कारकीर्दीतील पहिले एकदिवसीय शतक झळकावले होते. 2014 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध त्याने हे शतक केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिनची मुलगी अन् शुबमनच्या अफेअरची चर्चा सुस्साट; पण त्यामागची कारणं माहितीयेत का? वाचा
वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रिषभ पंत आहे कोट्यवधींचा मालक; पाहा त्याची ‘रॉयल’ लाईफस्टाईल