---Advertisement---

‘असं वाटतंय इंग्लंडने स्टार्टरसाठी हरा भरा कबाब ऑर्डर केलाय’, भारतीय दिग्गजाचा लॉर्ड्स खेळपट्टीवरुन टोला

On: गुरूवार, जून 3, 2021 5:24 PM
---Advertisement---

येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या मोठ्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघाला इंग्लंड संघाविरुद्ध दोन कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. या सामन्यात, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचे फलंदाज चांगली फलंदाजी करत असल्यामुळे न्यूझीलंड संघ मजबूत स्थितीत आहे. अशातच भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी मजेशीर ट्विट करत, लॉर्डस मैदानावरील खेळपट्टीला ट्रोल केले आहे.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जात आहे. तसेच या मैदानावरील खेळपट्टी हिरवीगार दिसून येत आहे. हे पाहून, वासिम जाफरने सामना सुरु होण्यापूर्वीच एक ट्विट केले होते. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

त्याने आपल्या ट्विटमध्ये लॉर्ड्स मैदानावरील खेळपट्टीचा फोटो शेअर केला आहे. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून, “असं वाटत आहे इंग्लंडने स्टार्टरसाठी हरा भरा कबाब ऑर्डर केला आहे”, असे लिहिले आहे. इंग्लंडने या मैदानावर भरपूर प्रमाणात हिरवेगार गवत सोडले आहे. वासिम जाफरच्या मते, या सामन्यात वेगवान गोलंदाजांना भरपूर मदत मिळणार आहे.

जेव्हा इंग्लंड संघ भारतात आला होता, तेव्हा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी भारतातील खेळपट्टीवर टीका केली होती. यामध्ये माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन हे सर्वात पुढे होते. या मालिकेत भारतीय संघाने इंग्लंड संघाचा ३-१ ने धुव्वा उडवला होता. त्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीनंतर होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडकडे व्याजासहित परतफेड करण्याची संधी असणार आहे.

यादिवशी रंगणार भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी सामने

पहिला कसोटी सामना – (४ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट , नॉटिंघम)
दुसरा कसोटी सामना – (१२ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट लॉर्ड्स )
तिसरा कसोटी सामना – (२५ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट , लीड्स
चौथा कसोटी सामना – ( २ सप्टेंबर ते ६ सप्टेंबर ,ओवल )
पाचवा कसोटी सामना -(१० सप्टेंबर ते १४ सप्टेंबर, मँचेस्टर )

महत्त्वाच्या बातम्या – 

‘या’ फलंदाजाच नादच खुळा, कसोटीत १० हजार धावा करणाऱ्या गावसकरांना करायचीय त्याच्यासारखी फलंदाजी

ऐकलंच पाहिजे! ‘किंग’ कोहली अन् ‘कोच’ शास्त्रींमधील संवादाचा ‘तो’ ऑडिओ लीक; इंटरनेटवर जोरदार व्हायरल

‘अरे त्या बाळाचा श्वास कोंडला जात असेल’, विरुष्कासह वामिकाचे फोटो काढल्यामुळे चाहत्यांचा संताप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---