चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये काल एडबॅस्टन मैदानावर झालेल्या पारंपरिक प्रतिस्पर्धेच्या सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला सहज धूळ चारली. भारताने तिन्ही विभागात पाकिस्तानला चित केले. मग ती फलंदाजी असो जी नेहमीच भारताची जमेची बाजू राहिली आहे, वा गोलंदाजी असो ज्यात भारतने मागील दशकात खूपच प्रगती केली आहे, किंवा क्षेत्ररक्षण असो जी की पाकिस्तानच्या संघाची नेहमीच कमकुवत बाजू राहिली आहे. पाकिस्तानच्या नवोदित कर्णधारानेही काल भारत विरुद्ध खेळताना काही विवादात्मक निर्णय घेतले. ज्यामुळे भारताला सामन्यावर पकड बनवता आली.
४. इमाद वासिम कडून गोलंदाजीची सुरुवात करणे
भारताचे फलंदाज फिरकी गोलंदाजाना अप्रतिम खेळतात हे सगळेजण जाणतातच, तरीसुद्धा सरफराजने वासिमकडून गोलंदाजीची सुरुवात केली. असे पण नव्हते ही चेंडू स्विंग होत नव्हता किंवा वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून मदत मिळत नव्हती, दुसऱ्या बाजूने महंमद अमीर सुरेख गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांना आपल्या गती आणि स्विंगने त्रास देत होता. वासिमला लवकर गोलंदाजी देण्याच्या निर्णयामुळे भारताचे सलामी फलंदाज सेट झाले आणि भारताला चांगली सुरुवात मिळाली.
३. गचाळ क्षेत्ररक्षण
पाकिस्तान क्षेत्ररक्षणामध्ये कधीच चांगला नव्हता आणि त्यानी हे आजही याच गोष्टीचे प्रात्यक्षिक पाकिस्तानच्या खेळाडूंनी दिले. ३९ व्या षटकात युवराज सिंगचा साधा झेल सोडला आणि मग युवराजने धमाकेदार फलंदाजी करत भारताकडून चॅम्पियन्स ट्रॉफी मधील सर्वात जलद अर्धशतक ठोकले. त्यानंतर लगेचच विराटचा ही झेल पाकिस्तानच्या खेळाडूने सोडला, पुढे जाऊन विराटने शेवटच्या काही षटकात जोरदार फटकेबाजी केली.
२. वहाब रियाझची सुमार गोलंदाजी
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात खराब गोलंदाजीची आकडेवारी वाहाबने काल आपल्या नावावर करून घेतली. कालच्या सामन्यात त्याने ८.४ षटकात ८७ धाव दिल्या आणि यामुळे भारतीय फलंदाजांना सेट होण्याची संधी मिळाली. पाकिस्तान वहाब रियाझकडून २०१५ च्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात त्याने टाकलेल्या गोलंदाजी सारख्या गोलंदाजीची अपॆक्षा करत होते पण त्याला ती काही जमली नाही आणि त्यानंतर त्याला दुखापतीमुळे मैदानही सोडावे लागले. तो नंतर फलंदाजीसाठी ही आला नाही.
१. कमकुवत फलंदाजी
पाकिस्तानची गोलंदाजी ही त्याची जमेची बाजू होती तर फलंदाजी ही कमकुवत बाजू होती, पण भारताने ४८ षटकात ३१९ धाव करून भारतीय फलंदाजीची प्रतिभा दाखवून दिली होती, त्यानंतर पाकिस्तानला फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. शोएब मलिक, सरफराज अहमद, मोहम्मद हाफिज या पाकिस्तानच्या स्टार फलंदाजांकडून पाकिस्तानला जास्त अपेक्षा होत्या पण त्यांनी आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली नाही आणि त्यामुळे पाकिस्तान सामन्यात तग धरू शकले नाही.