इंडियन प्रीमियर लीग 2020 चा अंतिम सामना मंगळवारी (10 नोव्हेंबर ) खेळला जाईल. हा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. मुंबई संघ अंतिम फेरीत का पोहोचला आणि हा संघ जेतेपदही जिंकू शकतो याविषयीची पाच कारणे आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
उत्कृष्ट गोलंदाजांचा भरणा
आयपीएलचे चार विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईच्या यशाचे रहस्य त्यांची अचूक गोलंदाजी होय. विशेषतः या संघातील भेदक मारा करणारे गोलंदाज नेहमीच आघाडीवर राहिले आहे. या हंगामात त्यांच्याकडे जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट हे वेगवान गोलंदाज आहेत. जे इतर संघांना खेळात आघाडी घेण्याची संधी कमी देतात. दोन्ही गोलंदाजांना पॉवरप्लेमध्ये आणि अखेरच्या षटकांत फलंदाजांना शांत ठेवण्यात यश आले आहे. ही जोडी आयपीएल 2020 मधील सर्वात आक्रमक जोडी आहे. या स्पर्धेत दोघांनी मिळून सर्वाधिक 49 बळी घेतले आहेत.
मजबूत सलामी जोडी
आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्सची सलामीची जोडी सर्वात मजबूत जोडी आहे. युवा फलंदाज क्विंटन डी कॉक आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्सला चांगली आणि भक्कम सुरुवात दिली आहे. रोहितला फार चांगली कामगिरी करता आलेली नाही. तरी त्याने सुरुवातीला डी कॉकला चांगली साथ दिली आहे. यानंतर सूर्यकुमार यादवने मधल्या फळीतील फलंदाजीची काळजी घेतली आहे.
खोलवर फलंदजी
युवा प्रतिभावान ईशान किशन, वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज कायरान पोलार्ड, अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि क्रुणाल पंड्या यांच्यासह मुंबई इंडियन्सची फलंदाजी खूपच मजबूत आणि आक्रमक आहे. अशा परिस्थितीत, मुंबईची सुरुवात चांगली असो किंवा खराब असो, परंतु पोलार्ड आणि पंड्यासारख्या फलंदाजांनी तळात फटकेबाजी करून मोठी धावसंख्या उभारली आहे.
उत्तम भारतीय खेळाडूंचा भरणा
मुंबई इंडियन्सने नेहमीच उत्तम भारतीय खेळाडूंचा समावेश केला असून हे संघाच्या यशाचे महत्त्वाचे कारण आहे. यावर्षी मुंबई संघात मोठे भारतीय खेळाडूही आहेत. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, पंड्या ब्रदर्स, सूर्यकुमार यादव, ईशान किशन हे भारतीय खेळाडू संघात आहेत. यासारखे खेळाडू संघात असणे अत्यंत महत्वाचे आहे. जरी परदेशी खेळाडू चांगल्या कामगिरीमुळे चर्चेत राहिले असले, तरीही संघ केवळ 4 परदेशी खेळाडूंना संघात ठेवू शकतात. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंची जबाबदारी अधिक वाढते.
अनुभवी खेळाडू
चार वेळा आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. मोठ्या आणि दबावाच्या सामन्यांमध्ये संघाला बराच अनुभव आहे. या संघात रोहित शर्मा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कायरान पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्विंटन डी कॉक यासारखे अनुभवी खेळाडू आहेत.
सहाव्यांदा आयपीएलचा अंतिम सामना खेळेल मुंबई
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, मुंबईने सहाव्यांदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या संघाने आयपीएलचे चार विजेतेपद जिंकले असून ते मागील हंगामातील चॅम्पियन आहेत. मुंबईने 2013, 2015, 2017 आणि 2019 या वर्षी आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. केवळ 2010 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर मुंबईला विजेतेपद मिळवता आले नाही. 2010 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादला १७ धावांनी धूळ चारत दिल्लीची फायनलमध्ये धडक, पाहा यापुर्वीच्या फायनलचा इतिहास
राजधानी एक्स्प्रेस सुसाट!! मागील १२ हंगामात न जमलेली कामगिरी यावर्षी दिल्लीकडून फत्ते
आयपीएल २०२०: हैदराबादला १७ धावांनी हरवत दिल्लीची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक, रबाडाची भेदक गोलंदाजी
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०च्या प्राईझ मनीमध्ये मोठी घट; विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मिळणार ‘इतके’ रुपये
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत