fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

या ५ कारणामुळे होणार पुण्यात आयपीएलचे सामने!

पुणे। आयपीएल २०१८चे पुण्यात फक्त बाद फेरीचे दोन सामने होणार होते. पण आता पुणे आयपीएलमधील एका संघाचे यजमानपद भूषवणार आहे.

दोन वर्षांनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला तामिळनाडूत कावेरी पाणी वाद पेटला असल्याने चेन्नईतील आपले बस्थान हलवावे लागले आहे. त्यामुळे आता चेन्नईचे नवीन घरचे मैदान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे गहूंजे येथील स्टेडिअम असणार आहे. 

परंतू हे सामने पुण्यातच का? याला अनेक कारणे आहेत. त्यातील महत्वाची ५ कारणे अशी- 

१. पुण्यात असणारे क्रिकेट चाहते- 

पुणे हे विद्येचे माहेर घर समजले जाते. परंतू हे शहर आता देशाची क्रीडा राजधानी म्हणूनही आपली ओळख निर्णाण करू लागले आहे. त्यामुळे सर्व खेळांच्या लीगमध्ये मुंबईबरोबर पुण्याची एक टीम असतेच. अशा या ५० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात क्रिकेटप्रेमींचा संख्या मोठी आहे. 

२. यापुर्वी झालेल्या अायपीएल सामन्यांचा फायदा- 

या शहराने आजपर्यंत दोन आयपीएल संघ पाहिले. ज्या संघ मालकांनी आयपीएलमध्ये संघ घेतले त्यांनी कायम पहिले प्राधान्य पुण्यालाच दिले आहे. त्यामूळे या शहरात जरी १० हंगामात घरचा संघ नसला तरी एक मोठा चाहचा वर्ग मात्र नक्की तयार झाला आहे. त्यामूळे नविन शहराचा शोध घेऊन नव्याने प्रेक्षक वर्ग शोधण्यापेक्षा एक आधीपासून असलेला मोठा प्रेक्षक वर्ग या शहरात आयपीएलला लगेच मिळतो. ज्यासाठी अन्य शहारात मात्र विशेष प्रयत्न करावे लागतात.  

३. धोनीचा संघ- 

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी यापुर्वीही या शहरात गेल्या दोन हंगामात खेळला आहे. धोनीचा एक मोठा चाहता वर्ग या शहरात आहे. गेल्या मोसमात जेव्हा पुण्याचे कर्णधारपद धोनीकडून काढून घेण्यात आले होते तेव्हा संघमालकाला पुणेकर चाहत्यांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. 

त्यामूळे त्याच धोनीचा जूना संघ पुन्हा जेव्हा अायपीएलमध्ये येत आहे तर पुणेकर त्याचे नक्कीच जंगी स्वागत करतील. 

 

४. प्रवास सोपा-

विशाखापट्टनम, पुणे, राजकोट आणि त्रिवेंद्रम यांच्यापैकी चेन्नई एक मैदान पक्के करणार होती.  विशाखापट्टनमवरून थेट विमान प्रवास खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. जर संघाला इंदोरला जायचे असेल तर त्यांना दिल्लीच्या मार्गाने जावे लागेल. पुण्यातून प्रवासाचे बरेच पर्याय उपलब्ध आहे. 

तसेच मुंबईला जर संघाला जायचे असेल तर ३ तासांचा प्रवास करून संघ आरामात मुंबईला पोहचू शकतो. तसेच हे मैदान शहरापासून दूर असून राष्ट्रीय महामार्गावर आहे. त्यामूळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थीतीत मैदान लगेच खाली होऊ शकते. त्यामूळे सुरक्षेच्या दृष्टीने हे मैदान आदर्शवत आहे. 

५. आयटीत काम करणाऱ्यांची संख्या- 

पुणे शहरला देशाचे आयटी हब म्हणूनही ओळखले जाते. आयपीएल ज्या शहरात सर्वात जास्त यशस्वी झाली त्यात पुणे, बेंगलोर, हैद्राबाद आणि चेन्नईसारख्या देशातील आयटी हबचा समावेश आहे. त्यातील पुण्यातील हिंजवडी आयटीपार्कसारखे मोठे पार्क महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडीअमपासून जवळ आहे. त्यामूळे या शहराला कायमच पहिली पसंती असणार आहे. 

 

You might also like