कालपासून(८ जूलै) इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज संघात कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील साऊथँप्टन येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा संघ पहिल्या डावात २०४ धावांवर सर्वबाद झाला आहे. या डावात वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डरने आज शानदार गोलंदाजी करताना २० षटकात ४२ धावा देत ६ विकेट्स घेतल्या आहेत.
याबरोबरच होल्डरने खास विक्रमही केले आहेत. विशेष म्हणजे मागील १० कसोटी सामन्यांमध्ये होल्डरने सहाव्यांदा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्याने मागच्या १० कसोटीमध्ये एकूण ११.८५ च्या सरासरीने ५५ विकेट्स घेतल्या आहेत.
आज ६ विकेट्स घेत होल्डरने केलेले खास विक्रम –
१. एका कसोटी डावात सर्वाधिकवेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे वेस्ट इंडिजचे कर्णधार –
७ वेळा – जेसन होल्डर
७ वेळा – कर्टनी वॉल्श
३ वेळा – गॅरी सोबर्स
३ वेळा – डेनिस ऍडकिन्सन
२. एखाद्या संघाविरुद्ध द्विशतक आणि ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा होल्डर तिसरा कर्णधार. त्याने जानेवारी २०१९ ला इंग्लंडविरुद्ध ब्रिजटाऊन येथे नाबाद २०२ धावांची खेळी केली होती. याआधी एकाच संघाविरुद्ध द्विशतक आणि ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी वासिम आक्रम (झिम्बाब्वे विरुद्ध) आणि डेनिस ऍडकिन्सन (ऑस्ट्रेलिया विरुद्ध) या कर्णधारांनी केली आहे.
३. एका कसोटी डावात सर्वाधिकवेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारे कर्णधार –
१२ वेळा – इम्रान खान (४८ सामने)
९ वेळा – रिची बेनॉड (२८ सामने)
८ वेळा – बिशन सिंग बेदी (२२ सामने)
७ वेळा – जेसन होल्डर (३३ सामने)
७ वेळा – कर्टनी वॉल्श (२२ सामने)
४. इंग्लंड विरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणारे वेस्ट इंडिजचे कर्णधार –
४२ धावा देत ६ विकेट्स – जेसन होल्डर (२०२०, साऊथँप्टन)
३१ धावा देत ५ विकेट्स – जॉन गॉडार्ड (१९४८, जॉर्जटाउन)
४१ धावा देत ५ विकेट्स – गॅरी सोबर्स (१९६६, लीड्स)
५. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिकवेळा ५ किंवा त्यापेक्षा विकेट्स घेणारे कर्णधार –
१२ – इम्रान खान
९ – रिची बेनॉड
९ – जेसन होल्डर
ट्रेंडिंग घडामोडी –
वाढदिवसाला गांगुलीला घरी मिळाले ६० केक, दिलदार गांगुलीने काय केले पहाच
भूत पाहून सौरव गांगुलीचीही टरकली! फायरब्रिगेडला बोलवलं थेट घरी
काय वेळ आलीय! पाकिस्तान क्रिकेटर्सला टी-शर्टवर आफ्रिदीचे नाव लावून खेळावे लागणार क्रिकेट