कसोटी हा क्रिकेटचा सर्वात जुना फॉरमॅट आहे. 2019-21 मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप सुरू झाल्यापासून कसोटी क्रिकेटच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
सामान्यतः असं मानलं जातं की, कसोटी फॉरमॅटमध्ये यजमान संघाला परिस्थितीचा जास्त फायदा होतो. परंतु अलीकडेच बांगलादेशनं पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत 2-0 असा विजय मिळवून करून हा समज दूर केला. बांगलादेशचा संघ 19 सप्टेंबरपासून 2 कसोटी आणि 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यापूर्वी आज आम्ही तुम्हाला अशा 5 संघांबद्दल सांगणार आहोत, ज्यांना घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
(5) न्यूझीलंड – न्यूझीलंडनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2019-21 फायनलमध्ये भारताचा पराभव करून पहिलं विजेतेपद पटकावलं. या यादीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडला आतापर्यंत घरच्या मैदानावर एकूण 69 कसोटी सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला.
(4) वेस्ट इंडिज – 80 आणि 90 च्या दशकात क्रिकेटवर राज्य करणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा अलिकडचा कसोटी रेकॉर्ड काही खास नाही. घरच्या मैदानावर कॅरेबियन संघ आतापर्यंत एकूण 70 सामने हरला आहे.
(3) दक्षिण आफ्रिका – जागतिक क्रिकेटला अनेक दिग्गज खेळाडू देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेनं मायदेशात एकूण 77 कसोटी सामने गमावले आहेत. यासह मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या संघांच्या यादीत ते तिसऱ्या स्थानावर आहेत.
(2) ऑस्ट्रेलिया – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 च्या विजेत्या ऑस्ट्रेलियन संघाबाबत बोललं जात की, त्यांना घरच्या मैदानावर पराभूत करणं फार अवघड आहे. मात्र, भारतीय संघाने अलिकडेच ऑस्ट्रेलियाला दोन वेळा घरच्या मैदानावर पराभूत केलं. ऑस्ट्रेलियन संघाला घरच्या मैदानावर एकूण 102 कसोटी सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
(1) इंग्लंड – मायदेशात सर्वाधिक कसोटी सामने गमावणाऱ्या संघांमध्ये इंग्लंड पहिल्या स्थानावर आहे. इंग्लंडला घरच्या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये संघर्ष करावा लागतो, हे या आकडेवारीवरून स्पष्ट होतं. घरच्या मैदनावर इंग्लंडला एकूण 129 कसोटी सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागलाय.
हेही वाचा –
आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात आरसीबीनं रोहित शर्मावर बोली का लावावी? जाणून घ्या 3 मोठी कारणं
विनेश फोगट निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार? राहुल गांधींच्या भेटीनं चर्चांना उधाण
‘कामगिरी दाखवा संघात स्थान मिळवा’, बांग्लादेशविरुद्ध संधी मिळणे सोपे नाही