कोलकाता। भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने त्याच्या आंतराष्ट्रीय कारकिर्दीतील त्याचे ५० वे शतक साजरे केले. त्याने सामन्यातील दुसऱ्या डावात १०४ धावांची नाबाद खेळी केली. हा सामना अनिर्णित राहिला.
हे शतक त्याचे कसोटी कारकिर्दीतील १८ वे शतक होते. त्याने वनडेत आत्तापर्यंत ३२ शतके केली आहेत. या यशाबद्दल सामना संपल्यावर विराट बोलत होता.
विराट म्हणाला ” याबद्दल छान वाटते. पण हा काही अजून मोठा टप्पा नाही. मी जर चांगला खेळत राहून अशीच कामगिरी करत राहिलो तर मला माझ्या नावासमोर किती शतके असतील याचा विचार करण्यापेक्षा खेळण्याचा जास्त आनंद होईल आणि माझी नेहमीच हा खेळ खेळताना हीच मानसिकता असते.”
विराटने आत्तापर्यंत ६१ कसोटी सामने खेळले आहेत यात त्याने १८ शतके आणि १४ अर्धशतकांसह ५० च्या सरासरीने ४७६२ धावा केल्या आहेत. तसेच २०२ वनडे सामन्यात ३२ शतके आणि ४५ अर्धशतकांसह ५५ च्या सरासरीने ९०३० धावा केल्या आहेत.