---Advertisement---

जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही! वयाच्या 58व्या वर्षी ऑलिम्पिक पदार्पण करणार ही महिला खेळाडू

On: शुक्रवार, जुलै 12, 2024 4:39 PM
---Advertisement---

ऑलिम्पिक खेळांचा इतिहास खूप जुना आहे. या खेळातील अनेक प्रेरणादायी कथा आपण ऐकल्या आणि पाहिल्या असतील. आगामी पॅरिस ऑलिम्पिक मध्ये एक आणखी प्रेरणादायी कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक 58 वर्षीय महिला खेळाडू पदार्पण करणार आहे! झियिंग झेंग असं या महिला खेळाडूचं नाव असून ती टेबल टेनिसपटू आहे. झियिंग झेंग ही एके काळी चिनी क्रीडापटू होती. मात्र काही कारणास्तव ती चिली या देशामध्ये स्थायिक झाली आणि नंतर त्या देशाकडून खेळायला लागली.

टेबल टेनिसपटू झियिंग झेंगचं ऑलिम्पिकमध्ये खेळायचं स्वप्न वयाच्या 58 व्या वर्षी पूर्ण झालं आहे. ती आता 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसणार आहे. झियिंग झेंग हिनं काही वर्षांपूर्वी व्यावसायिक टेबल टेनिसमधून निवृत्ती घेतली होती. मात्र कोविड-19 महामारीच्या काळात तिनं घरात एकटीनं टेबल टेनिस खेळून आपला उत्साह कायम ठेवला. लॉकडाऊन संपल्यावर तिनं स्थानिक स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि त्या सर्व स्पर्धा सहज जिंकल्या. 2023 पर्यंत ती देशातील सर्वोच्च महिला खेळाडू बनली आणि तिची चिली राष्ट्रीय संघासाठी निवड झाली.

झियिंग झेंग हिचा जन्म 1966 मध्ये चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात झाला. तिच्या आईनं तिला लहानपणी खेळाचं प्रशिक्षण दिलं. तिची वयाच्या 11 व्या वर्षी बीजिंगमधील ज्युनियर एलिट संघासाठी निवड झाली. 1983 मध्ये झियिंग झेंगची चीनच्या राष्ट्रीय टेबल टेनिस संघासाठी निवड झाली. तेव्हापासून तिचं ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न आहे. मात्र 1986 मध्ये सुरू झालेल्या “टू-कलर रूल” मुळे तिच्या खेळाला फटका बसला आणि तिनं राष्ट्रीय संघ सोडला.

1989 मध्ये एका चिनी प्रशिक्षकानं झेंग हिला चिलीमध्ये शालेय मुलांना प्रशिक्षण देण्याची नोकरी देऊ केली. यानंतर तिनं चिलीमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. ती तेथे चिनी वस्तूंच्या आयात व्यवसायातही गुंतली. 2002 मध्ये झेंगनं पुन्हा टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली आणि नंतक स्थानिक स्पर्धा जिंकत राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं. आता ती 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चिली संघाकडून खेळताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

3 खेळाडू जे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक बनू शकतात, गंभीरनं सुचवलं या विदेशी खेळाडूचं नाव
ऑलिम्पिकमध्ये भारत पाकिस्तानपेक्षा किती पुढे? दोन्ही देशांनी आतापर्यंत किती पदकं जिंकली? जाणून घ्या
3 असे खेळाडू, ज्यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---