इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अंतिम कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडणार होता. परंतु, हा सामना रद्द करण्यात आला आहे. काहीदिवसांपूर्वी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. याच कारणास्तव भारतीय खेळाडूंनी अंतिम कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता. शेवटी दोन्ही बोर्डने मिळून अंतिम कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, अनेकांना प्रश्न पडला असेल की, हा सामना रद्द करण्यात आल्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत काय परिणाम होईल का? चला तर जाणून घेऊया.
या कसोटी मालिकेतील अंतिम सामना रद्द करण्यात आला असला तरी देखील, भारतीय संघाच्या गुणांवर याचा कुठलाही परिणाम झाला नाही. भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी कायम आहे. भारतीय संघाच्या खात्यात अजूनही २६ गुण आहेत. तसेच त्यांच्या गुणांची टक्केवारी ५४.१७ टक्के आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात भारतीय संघाने आतापर्यंत ५ कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाला २ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर एक सामना अनिर्णीत आणि एक सामना रद्द करण्यात आला आणि एका सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना पुढच्या वर्षी खेळवण्यात येऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार पुढील वर्षात भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. त्यावेळी भारत आणि इंग्लंड संघांना वनडे आणि टी-२० मालिका खेळायची आहे. या दरम्यान मँचेस्टर कसोटी सामना खेळवण्यात येऊ शकतो. पण अजूनपर्यंत याची पुष्टी केली गेली नाहीये. (5th test called off find out updated ICC world test championship points table)
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपल्या विधानात स्पष्ट केले होते की, भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारतीय खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला होता. ज्यामुळे अंतिम सामना रद्द करण्यात आला. तसेच जय शाह यांनी देखील म्हटले आहे की, “बीसीसीआय आणि ईसीबीचे संबंध चांगले असल्यामुळे, बीसीसीआयने ईसीबीकडे अंतिम सामना पुन्हा आयोजित करण्यासाठीचा प्रस्ताव मांडला आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
शुबमन गिलला सारा तेंडुलकरने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; अफेअरच्या चर्चांना पुन्हा उधाण
‘कोहलीला भेटण्यासाठी रोनाल्डो मँचेस्टर युनायटेडमध्ये झाला सहभागी’, शुबमन गिलचे ट्वीट तुफान व्हायरल