कटक। भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टी २० सामन्यात भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीने २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारून एका विक्रमला गवसणी घातली.
आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये धोनीने आजपर्यंत आठ वेळा असे केले आहे. प्रथम फलंदाजी करताना धोनीने असे ५ वेळा तर धावांचा पाठलाग करताना ३ वेळा असे केले आहे. आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक वेळा २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याचा विक्रम धोनीच्या नावावर आहे.
धोनी हा त्याच्या फिनिशिंग कौशल्यासाठी ओळखला जातो. त्याचे डावाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार मारण्याचे कौशल्य अचंबित करणारे आहे. याचाच प्रत्येय आज कटक येथील बाराबती स्टेडिअमवर सामना बघायला आलेल्या प्रेक्षकांना आला.
धोनीने या सामन्यात आक्रमक फलंदाजी करताना २२ चेंडूत नाबाद ३९ धावांची खेळी केली. यात त्याने ४ चौकार आणि १ षटकार खेचला. त्याने मनीष पांडेबरोबर केलेल्या आक्रमक नाबाद अर्धशतकी भागीदारीमुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना १८० धावांचा टप्पा पार केला.