आपल्याला माहिती आहे की, आजकाल क्रिकेटपटू (महिला किंवा पुरुष) परदेशातील मुलींशी लग्न करतात. इतकेच नव्हे तर एका देशातील महिला क्रिकेटपटू दुसऱ्या देशांतील महिला क्रिकेटपटूंशीही लग्न करतात. अशाच प्रकारची आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण या लेखात भारतीय मुलींशी लग्न करणाऱ्या परदेशातील ६ क्रिकेटपटूंचा आढावा घेणार आहोत.
भारतीय महिलांशी लग्न करणारे ६ परदेशी क्रिकेटपटू-
६. ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell)-
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलने नुकतेच त्याची भारतातील गर्लफ्रेंड विनी रमणबरोबर (Vini Raman) फेब्रुवारी २०२०मध्ये लग्न केले आहे. ही बातमी त्याने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली होती. मॅक्सवेल अनेक वर्षांपासून डेट करत होता. २६ वर्षीय विनी भारतीय आहे. परंतु तिचा जन्म ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये झाला होता.
५. ग्लेन टर्नर (Glenn Turner)-
न्यूझीलंड संघाचा माजी फलंदाज ग्लेन टर्नरने जुलै १९७३मध्ये सुखविंदर कौर गिलशी (Sukhvinder Kaur Gill) लग्न केले होते. सुखविंदरला न्यूझीलंडमध्ये सुख्खी टर्नर या नावाने ओळखले जाते. १९७१मध्ये ग्लेन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आला होता. त्या दरम्यान ग्लेनची एका पार्टीमध्ये सुखविंदरशी भेट झाली होती. यावेळीच दोघांमध्ये मैत्री झाली होती.
अनेक वर्ष दूर राहूनही दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला नाही. त्यांनी १९७३मध्ये लग्न केले होते. सुखविंदर न्यूझीलंडला जाऊन राजकारणात सक्रिय झाली होती. सुखविंदर १९९५ ते २००४पर्यंत डुनेडिनची महापौर (Mayor) होती. न्यूझीलंडमध्ये सुखविंदरला भारताचा एक मोठा चेहरा म्हणून पाहिले जाते.
४. माइक ब्रेअर्ली (Mike Brearley)-
इंग्लंडचा माजी कर्णधार माइक ब्रेअर्लीने १९८१मध्ये इंग्लंड संघाला ऍशेस सामना जिंकून दिली होती. माईक आणि माना साराभाई यांची पहिली भेट १९७६-७७मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यावर झाली होती. माना गुजरातच्या मोठ्या व्यावसायिक गौतम साराभाई यांची मुलगी आहे. गौतम यांना असे वाटत होते की, त्यांच्या जावयाला गुजरातच्या संस्कृतीबद्दल माहती असायला पाहिजे. यामुळेच माइकने मानाशी लग्न करण्यापूर्वी ४ वर्षांंपर्यंत गुजराती भाषा शिकून घेतली. लग्नानंतर माना माइकबरोबर लंडनमध्ये स्थायिक झाली.
३. शॉन टेट (Shaun Tait)-
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज शॉन टेट व माशूम सिंघा (Mashoom Singha) यांची भेट २०१०मध्ये झाली होती. यावेळी शॉन आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळत होता. दोघेही ४ वर्षांपर्यंत रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर शॉनने माशूमाला पॅरिसमध्ये प्रपोज केले. २ जून २०१४मध्ये शॉनने माशूमशी मुंबई येथे लग्न केले. शॉनच्या लग्नामध्ये भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि युवराज सिंगबरोबरच अनेक खेळाडू होते.
२. मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan)-
जागतिक वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. त्याने चेन्नईच्या एका नामवंत व्यावसायिकाची मुलगी मधिमलार रामामूर्तीशी (Muttiah Muralitharan) २००५मध्ये लग्न केले होते. मुरलीधरन आणि मधिमलारची पहिली भेट दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखरने करून दिली होती.
मुरलीधरनला मधिमलार पहिल्या भेटीत आवडली होती. ही भेट केवळ १० मिनिटांची होती. परंतु मधिमलार आणि मुरलीधरन जवळपास २ तास कधी झाले हे त्यांना कळलेच नाही. या पहिल्या भेटीतच मुरलीधरनने मधिमलारला प्रपोज केला होता. त्यानंतर २१ मार्च २००५ला या दोघांचे लग्न झाले. या लग्नात श्रीलंकेच्या खेळाडूंबरोबरच भारतीय क्रिकेटपटूंंनीही हजेरी लावली होती.
१. शोएब मलिक (Shoaib Malik)-
पाकिस्तान संघाचा क्रिकेटपटू शोएब मलिक आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाची (Sania Mirza) पहिली भेट ऑस्ट्रेलियामध्ये झाली होती. इथूनच सानिया आणि शोएबच्या प्रेमप्रकरणाला सुरुवात झाली होती. या दोघांनीही २०१०मध्ये लग्न केले होते. यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद निर्माण झाले होते. काही लोकांनी या दोघांना पाठिंबा दिला, तर काही लोकांनी यांना गद्दार म्हटले होते.
तरीही आज १० वर्षांनंतरही या दोघांमधील प्रेम कमी झालेले नाही. २०१८मध्ये सानिया आणि शोएब हे आई-वडील झाले होते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-३ असे रणजी विक्रम, जे केवळ आहेत वसिम जाफरच्या नावावर
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद
-रोहित शर्मावर झाला मोठा अन्याय, लक्ष्मणही झाला यामुळे नाराज