---Advertisement---

6 भारतीय फलंदाज ज्यांनी एका वर्षात ठोकल्या सर्वाधिक 50+ धावा

On: शुक्रवार, डिसेंबर 27, 2024 1:40 PM
---Advertisement---

सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली जात आहे. दरम्यान भारताचा युवा सलामीवीर ‘यशस्वी जयस्वाल’ने (Yashasvi Jaiswal) मेलबर्न येथे सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकासह त्याचे नाव महान खेळाडूंच्या यादीत समाविष्ट झाले आहे. या वर्षातील जयस्वालचे हे 8वे कसोटी अर्धशतक आहे. एका वर्षात सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या भारतीय दिग्गजांच्या यादीत तो आता सामील झाला आहे.

2024 हे वर्ष यशस्वी जयस्वालसाठी खूप चांगले वर्ष ठरले आहे. या वर्षी कसोटीमध्ये तो जगातील दुसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. जयस्वालने या वर्षात आतापर्यंत 3 शतके आणि 8 अर्धशतके झळकावली आहेत. यामध्ये एका द्विशतकाचाही समावेश आहे.

यासह, तो एका वर्षात तिसऱ्यांदा सर्वाधिक वेळा कसोटीत 50+ धावा करणारा भारतीय फलंदाज बनला आहे. गुंडप्पा विश्वनाथ (Gundappa Viswanath) यांनी 1979 मध्ये आणि मोहिंदर अमरनाथ (Mohinder Amarnath) यांनी 1983 मध्ये एका वर्षात प्रत्येकी 11 वेळा कसोटीत 50+ धावा केल्या आहेत.

1979 मध्ये सुनील गावसकर (Sunil Gavaskar), 2010 मध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये 12 वेळा 50+ धावा केल्या आहेत. या बाबतीत दोघंही संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहेत. सचिनने त्या वर्षी सर्वाधिक 2,562 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 7 शतकांसह 5 अर्धशतके झळकावली. दरम्यान त्याने दुहेरी शतकेही झळकावली. 1779 मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या गावसकर यांनी 4 शतकांसह 8 अर्धशतके झळकावली. दरम्यान त्यांनी द्विशतकही झळकावले.

एका वर्षात सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या यादीत दिग्गज भारतीय खेळाडू ‘वीरेंद्र सेहवाग’चा (Virender Sehwag) देखील समावेश आहे. सेहवागने 2010 मध्ये कसोटीत 5 शतकांसह 8 अर्धशतके झळकावली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

भारतावर फॉलोऑनचे संकट, अर्धा संघ तंबूत परत, बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वरचढ
IND vs AUS; भारताला चौथा धक्का! जयस्वाल पाठोपाठ कोहलीही तंबूत
VIDEO; सुरक्षेचा घेरा तोडून विराटला भेटण्यासाठी थेट मैदानातच धावत सुटला चाहता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---