आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंच्या नावावर अनेक वेगवेगळे रेकाॅर्ड्स आहेत, काही रेकाॅर्ड्स निराशाजनक आहेत. या बातमीद्वारे आपण कसोटी क्रिकेटच्या अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊया, जे फक्त एका धावेमुळे आपला रेकाॅर्ड्स बनवण्यापासून दूर राहिले. म्हणजे ते खेळाडू 99 धावांवर बाद झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच या यादीत भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचे (Rishabh Pant) नाव समाविष्ट झाले आहे.
रिषभ पंत- या यादीत पहिले नाव रिषभ पंतचे (Rishabh Pant) आहे. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पंत 99 धावांवर बाद झाला.
महेंद्रसिंग धोनी- या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) दुसऱ्या स्थानावर आहे. धोनी 2012 मध्ये इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात 99 धावांवर बाद झाला होता. हा कसोटी सामना नागपुरमध्ये खेळला गेला होता.
अजित वाडेकर- या यादीत अजित वाडेकर (Ajit Wadekar) यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. 1967 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळल्या गेलेल्या मेलबर्न कसोटी सामन्यात वाडेकर 99 धावांवर बाद झाले होते.
मुरली विजय- या यादीत भारताचा सलामीवीर मुरली विजयचाही (Murli Vijay) समावेश आहे. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळल्या गेलेल्या ॲडलेड कसोटीत मुरली विजय (Murli Vijay) 99 धावांवर बाद झाला होता.
नवज्योत सिंग सिद्धू- या यादीत क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धूचाही (Navjot Singh Sidhu) समावेश आहे. 1994 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या बेंगळुरू कसोटीत तो 99 धावांवर बाद झाला होता.
वीरेंद्र सेहवाग- 2010 मध्ये श्रीलंकेविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवागही (Virender Sehwag) 99 धावांवर बाद झाला होता.
सौरव गांगुली- या यादीत सौरव गांगुलीचाही (Sourav Ganguly) समावेश आहे. गांगुली एकदा नाही तर दोनदा 99 धावांवर बाद झाला आहे. पहिल्यांदा 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि दुसऱ्यांदा 2002 मध्ये नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरूद्ध 99 धावांवर बाद झाला आहे.
हेही वाचा-
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय सलामीवीरांची यादी (टाॅप-5)
कॉमनवेल्थ गेम्स 2026 साठी मोठा निर्णय, क्रिकेट आणि हॉकीसह या खेळांवर बंदी..!
कॉमनवेल्थ गेम्स 2026 साठी मोठा निर्णय, क्रिकेट आणि हॉकीसह या खेळांवर बंदी..!