---Advertisement---

22 चेंडूत घेतल्या 6 विकेट्स, RCB साठी केला होता विक्रम, तरीही या गोलंदाजाकडे दुर्लक्ष?

---Advertisement---

आयपीएल 2025 हंगाम रेकॉर्ड तोडण्यासाठी सिद्ध होतं आहे. एका पाठोपाठ एक सामन्यांमध्ये रेकॉर्डस तुटताना दिसून येत आहेत. पण दोन असे रेकॉर्डस आहेत ज्यांना तोडणे तर दूरच पण तिथपर्यंत कोणी पोहचू देखील शकत नाही. एक क्रिस गेलचा 175 धावांचा विक्रम आहे, तर दुसरा महाविक्रम एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा आहे. गोलंदाजीचा हा विक्रम त्या गोलंदाजांच्या नावावर आहे, ज्या गोलंदाजाला ह्या हंगामामध्ये दुर्लक्षित केले गेले आहे.

हा खेळाडू म्हणजे आरसीबीसाठी खेळलेला अल्जारी जोसेफ. ज्याने एकेकाळी त्याच्या चेंडूने आयपीएलच्या एका सामन्यात 6 विकेट्स घेऊन शानदार कामगिरी केली होती. आयपीएलच्या एका सामन्यात सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा विक्रम अल्जारी जोसेफच्या नावावर आहे. त्याने 2008 मध्ये सोहेल तनवीरने बनवलेला हा विक्रम 2019 मध्ये मोडला होता. तसेच अव्वल स्थानावर बाजी मारली होती.

आयपीएल 2025 मेगा लिलावात अल्जारी जोसेफच नाव होत पण त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. तो अनसोल्ड ठरला. 2024 मध्ये तो आरसीबी संघात सामील होता, पण नंतर संघाने त्याला रिलीज केले होते. 2019 मध्ये त्याने फक्त 22 चेंडूत सनराइजर्स हैदराबादच्या 6 खेळाडूंना बाद केले होते.

आयपीएल 2025 मध्ये आरसीबी एका पाठोपाठ एक सामन्यांमध्ये शानदार प्रदर्शन करताना दिसत आहे आणि प्लेऑफ मध्ये पोहोचण्याची दावेदार आहे. आरसीबीकडे भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड यांच्याशिवाय कोणता घातक गोलंदाज नाही, संघाने आतापर्यंत 6 मधील 4 सामने जिंकले आहेत. तसेच संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---