के एल राहुल आणि आथिया शेट्टी यांनी लग्नाच्या 2 वर्षानंतर 24 मार्च 2025 रोजी त्यांच्या लहान लेकीच स्वागत केलं आहे. आता दोघांनी मुलीच गोड असं नाव देखील ठेवलं आहे. ज्याचा अर्थ वाचून तुम्हाला सुद्धा छान वाटेल. आताच त्यांनी मुली सोबत एक फोटो शेअर करत त्याच्या सोबत नाव देखील सांगितल आहे. ज्यावर चाहत्यांसोबत मोठ-मोठे कलाकार देखील अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
अथिया शेट्टी आणि राहुल यांनी त्यांच्या लेकीच नाव इवारा विपुला ठेवलं आहे. ज्याचा अर्थ असा आहे की, देवाने दिलेली भेट. तिच्या नावासोबत त्यांनी तिच्या पंजीआजीच नाव तसेच बाबा राहुलचं नाव जोडलं आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये के एल राहुलने बाळाला त्याच्या हातात उचलून घेतले आहे आणि अथिया तिच्याकडे पाहून हसत आहे. फोटोमध्ये मुलीचा चेहरा दिसत नाही. पण नाव ऐकून चाहते अभिनंदन करत आहेत.
फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आमची मुलगी, आमच सर्वकाही. इवारा- देवाने दिलेली भेट. या पोस्टवर अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, समंथा रूथ प्रभू, शोभिता धुलिपाला यांनी आनंद व्यक्त करणाऱ्या कॉमेंट्स केल्या आहेत. के एल राहुल आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे, त्यानिमित्ताने त्यांनी चाहत्यांना ही गोड भेट दिली आहे.






