नाशिक । नाशिक सायकलीस्टसचा महत्वाचा उपक्रम असलेला नाशिक रँडोनर्स मायलर्स म्हणजेच एनआरएम या उपक्रमाच्या दुसऱ्या पर्वातील ४थी फेरी उत्साहात पार पडली. एकूण ४० आणि १२० किमीची ही स्वीट समर राईड गंगापूर नाका (फायरफॉक्स सायकल्स)- आडगाव नाका-भरवीर फाटा- नाशिक (पिंप्रीकर हॉस्पिटल्स) या मार्गावर पार पडली.
एकूण ६० सायकलीस्टसने सहभाग नोंदवला. त्यापैकी ३५ सायकलीस्टसने ही राईड वेळेत पूर्ण केली.
नाशिक रँडॉनर्स मायलर्स हा मॅरेथॉन रनच्या धर्तीवर सुरु झालेल्या बीआरएम म्हणजेच ब्रेव्हेट रँडॉनर्स मायलर्स या लांब अंतराच्या व कमी वेगाच्या सायकलिंगसाठीचा तयारी करण्यासाठी बनविण्यात आलेला कार्यक्रम आहे.
८० आणि १२० किमीच्या टप्प्यात होणारी एनआरएम राईड आता ४० किमीच्या टप्प्यातही आयोजित करण्यात येत असून यावेळी तब्बल २५ सायकलीस्टसने सहभाग घेतला. यामुळे एनआरएम चळवळ बहरणार असून तात्पर्याने बीआरएम साठी सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढण्यात याचा फायदा होणार आहे.
बीआरएम राईड्स नाशिक शहरात आयोजित करणारे आणि रॅम फिनिशर डॉ. महेंद्र महाजन, विजय काळे यांच्यासह ६० सायकालिस्टस तसेच अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया यांच्या कुटुंबातील सर्व जण या एनआरएम २.४ या राईडमध्ये सहभाग नोंदवला.
नाशिक सायकलीस्टसच्या एनआरएम उपक्रमाची जबाबदारी नीता नारंग, एनसीएफचे अध्यक्ष प्रविणकुमार खाबिया हे यशस्वीपणे पार पडत आहेत.