आज हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपला सुरुवात झाली. संध्याकाळी ५ वाजता उदघाटन सोहळा सुरु झाल्यानंतर मुख्य सामन्यांना सुरु व्हायला पाऊणे नऊ वाजले.
यानंतर अपेक्षेप्रमाणे महिला गटात तामिळनाडूने मणिपूरवर ४५-२८ असा विजय मिळवला तर छत्तीसगढने पॉंडिचेरीवर ६१-१२ असा विजय मिळवला.
पुरुषांच्या पहिल्याच सामन्यात कर्नाटक संघाने विदर्भावर ७५-९ असा मोठा विजय पहिल्याच दिवशी नोंदवला. दुसऱ्या सामन्यात केरळने ओडिशाचा ४९-३५ असा पराभव केला.
तिसऱ्या सामन्यात गुजरातने जम्मू काश्मीरचा ४०-२६ असा पराभव केला. दक्षिणेतील संघांचं आजच्या दिवशी स्पर्धेत वर्चस्व राहील. आणि चौथा सामनाही आंध्रप्रदेशने बंगालला ५०-१८ असा पराभूत करत जिंकला.
पहिल्या दिवसाचा निकाल (३१ डिसेंबर २०१७)
पुरुष गटाचे सामने-
सामना १: कर्नाटक विजयी विरुद्ध विदर्भ- ७५-९
सामना २: केरळ विजयी विरुद्ध ओडिशा ४९-३५
सामना ३: गुजरात विजयी विरुद्ध जम्मू-काश्मीर ४०-२६
सामना ४: आंध्रप्रदेश विजयी विरुद्ध बंगाल ५०-१८
महिला गटाचे सामने-
सामना १: तामिळनाडू विजयी विरुद्ध मणिपूर- ४५-२८
सामना २: छत्तीसगढ विजयी विरुद्ध पॉंडिचेरी- ६१-१२
पहिल्या दिवसाच्या समाप्तीनंतर गुणतालिका (३१ डिसेंबर २०१७)
पुरुष विभाग
ग्रुप- अ
कर्नाटक: सामने-१, विजय-१, पराभव-०
विदर्भ:सामने-१, विजय-०, पराभव-१
ग्रुप ब
केरळ: सामने-१, विजय-१, पराभव-०
ओडिशा: सामने-१, विजय-०, पराभव-१
ग्रुप क
जम्मू आणि काश्मीर: सामने-१, विजय-०, पराभव-१
गुजरात: सामने-१, विजय-१, पराभव-०
ग्रुप ड
बंगाल: सामने-१, विजय-०, पराभव-१
आंध्रप्रदेश: सामने-१, विजय-१, पराभव-०
महिला विभाग
ग्रुप अ
तामिळनाडू: सामने-१, विजय-१, पराभव-०
मणिपूर: सामने-१, विजय-०, पराभव-१
ग्रुप ब
पॉण्डेचेरी: सामने-१, विजय-१, पराभव-०
छत्तीसगढ: सामने-१, विजय-०, पराभव-१