दुबई। एशिया कप 2018 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात 28 सप्टेंबरला भारताने बांगलादेशवर 3 विकेट्सने विजय मिळवत सातव्यांदा विजेतेपद मिळवले आहे. याबरोबरच भारताने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ंमोठा विक्रमही केला आहे.
भारताचा या एशिया कपच्या अंतिम सामन्यातील विजय हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 700 वा विजय होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम याआधी फक्त आॅस्ट्रेलिया आणि इंग्लडेने केला आहे.
भारताने 700 सामन्यातील विजयांपैकी कसोटीत 146 सामने, वनडेत 489 सामने आणि टी20 मध्ये 65 सामने जिंकले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवण्याचा विक्रम आॅस्ट्रेलियाच्या नावावर असून त्यांनी 995 सामन्यात विजय मिळवले आहेत. तर इंग्लंड 767 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ-
995 सामने – आॅस्ट्रेलिया
767 सामने – इंग्लंड
700 सामने – भारत
693 सामने – पाकिस्तान
604 सामने – विंडिज
महत्त्वाच्या बातम्या-
–केदार जाधवने विजयी धाव घेत टीम इंडियाला मिळवून दिले सातव्यांदा एशिया कपचे विजेतेपद
–आशिया कपमधील खराब कामगिरीचा मोहम्मद आमिरला मोठा फटका