भारत विरूद्ध बांगलादेश टी२० सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत १७ धावांनी विजय मिळवला. रोहीत शर्माने या सामन्यात ८९ तर सुरेश रैनाने ४७ धावा केल्या.
गोलंदाजीत वाॅशिंगटन सुंदरने ४ षटकांत २२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात अनेक विक्रम पहायला मिळालेय त्यातील सर्वात खास विक्रम झाला तो कर्णधार रोहीत शर्माकडून. गेले ६ टी२० सामने आपल्या फाॅर्मशी झगडणाऱ्या रोहीतने काल फटकेबाजी करत ६१ चेंडूत ८९ धावांची खेळी केली.
यात त्याने ५ चौकार आणि ५ षटकारांची आतिशबाजी केली. जेव्हा त्याने ५वा षटकार खेचला तेव्हा त्याचा हा आंतरराष्ट्रीय टी२० मधील ७५वा षटकार होता.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम युवराजच्या नावावर होताय त्याने ५१ सामन्यात ७४ षटकार खेचले होते. तर रोहीतला ७५ षटकारांसाठी ७१ सामने लागले.
भारताकडून कसोटीत सर्वाधिक षटकार विरेंद्र सेहवागने, वनडेत एमएस धोनीने तर टी२० मध्ये रोहीत शर्माने मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक षटकार खेचण्याचा क्रमवारीत रोहीत ८व्या स्थानावर आला असून ख्रीस गेल १०३ षटकारांसह अव्वल आहे.