पुणे, 29 जानेवारी, 2024: इन्फोसिस यांच्या वतीने आयोजित सातव्या “इन्फोसिस कप 2023-24” आंतर आयटी क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत इन्फोसिस बीयु, यार्डी या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.
इन्फोसिस मैदान, हिंजवडी, फेज 2 या ठिकाणी दर आठवड्याच्या शेवटी शनिवार व रविवार या दिवशी सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत समीर कुदळे(4-14)याने केलेल्या सुरेख अष्टपैलू खेळीच्या जोरावर इन्फोसिस बीयू संघाने मर्क्स संघाचा 7गडी राखून पराभव करत शानदार सुरुवात केली.
दुसऱ्या सामन्यात सौरभ देवरे नाबाद 70 धावांसह मयूर राठोड(4-23)याने केलेल्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर यार्डी संघाने दसॉल्ट सिस्टीम संघाचा 21 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. याआधी स्पर्धेचे उदघाटन इन्फोसिस रिक्रिएशनल क्लब, पुणेचे मुख्य अनंत बारटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इन्फोसिस रिक्रिएशनल क्लब, पुणेच्या कोअर समितीचे सदस्य सुनिल टक्के आदी मान्यवर उपस्थित होते. (7th “Infosys Cup 2023-24” Inter IT Cricket Tournament Infosys BU, Yardi Teams Open)
निकाल: साखळी फेरी:
मर्क्स: 20 षटकात सर्वबाद 98 धावा(महेश वटवाड 23, प्रतीक डी.18, समीर कुदळे 4-14, दीपक जैन 3-8, सुनील टक्के 1-4) पराभुत वि.इन्फोसिस बीयू: 3.4 षटकात 3बाद 99धावा(विशाल भैरमडगीकर नाबाद 44(38,5×4), सुनील टक्के 28( 32,3×4), प्रियांक चौहान 2-24);सामनावीर-समीर कुदळे; इन्फोसिस बीयू संघ 7गडी राखून विजयी;
यार्डी: 20 षटकात 5बाद 162धावा(सौरभ देवरे नाबाद 70 (43,6×4, 4×6), सौरभ जळगावकर 39 (44,6×4), जीवन गोसावी नाबाद 18, मंदार जोशी 2-26) वि.वि.दसॉल्ट सिस्टीम:19.2 षटकात सर्वबाद 141धावा(गौरव सिंग 44(20,4×4,4×6), भूषण पाटील 18, अभिराम एचआर 12, गगन शर्मा 11, मयूर राठोड 4-23, आशु शेख 3-30, सौरभ देवरे 2-22); सामनावीर-मयूर राठोड ; यार्डी संघ 21 धावांनी विजयी;
महत्वाच्या बातम्या –
हैद्राबाद येथे होणाऱ्या ४९व्या राष्ट्रीय कुमार/कुमारी गट कबड्डी स्पर्धेकरीता महाराष्ट्राचे संघ जाहीर.
राष्ट्रीय रोइंग स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडूंमध्ये विजेतेपदासाठी चुरस देशभरातील ४७० अव्वल नौकानयनपटूंचा सहभाग






