आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने आगामी विश्वचषकातील 9 सामने रिशेड्यूल केले आहेत. विविध कारणांमुळे हे सामने आधीच्या ठरलेल्या तारखेपेक्षा आधी किंवा नंतर खेळले जातील. त्यानंतर आयसीसी नुकतेच नव्हे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना आता 15 ऑक्टोबर ऐवजी 14 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल.
विश्वचषकाच्या वेळापत्रकाची घोषणा केल्यानंतर काही दिवसातच वेळापत्रकात बदल करावे लागणार अशी शक्यता निर्माण झाली होती. कारण, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील 15 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सामन्या दिवशीच गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस येत होता. सुरक्षेच्या समस्या निर्माण होऊ नये त्यासाठी हा सामना एक दिवस आधी घेण्याचे ठरले आहे.
तसेच, इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यामधील 12 नोव्हेंबर रोजी नियोजित असलेला सामना 11 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथेच होईल. या सुधारित वेळापत्रकानुसार भारतीय संघाच्या दोन सामन्यात बदल करण्यात आला असून, भारत पाकिस्तान सामन्या व्यतिरिक्त भारत नेदरलँड्स हा सामना देखील नियोजित कार्यक्रमाच्या एक दिवस आधी होईल.
9 matches rescheduled by ICC for World Cup 2023:
ENG vs BAN on Oct 10
PAK vs SL on Oct 10
AUS vs SA on Oct 12
NZ vs BAN Oct 13
IND vs PAK on Oct 14
ENG vs AFG on Oct 15
AUS vs BAN on Nov 11
ENG vs PAK on Nov 11
IND vs NED on Nov 12 pic.twitter.com/jBxEujV4yU— Johns. (@CricCrazyJohns) August 9, 2023
बदललेले वेळापत्रक
10 ऑक्टोबर. इंग्लंड वि बांगलादेश
10 ऑक्टोबर. पाकिस्तान वि श्रीलंका
12 ऑक्टोबर ऑस्ट्रेलिया वि द. आफ्रिका
13 ऑक्टोबर न्यूझीलंड वि बांगलादेश
14 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान
15 ऑक्टोबर इंग्लंड वि अफगाणिस्तान
11 नोव्हेंबर ऑस्ट्रेलिया वि बांगलादेश
11 नोव्हेंबर इंग्लंड वि पाकिस्तान
12 नोव्हेंबर भारत वि नेदरलँड्स
(9 matches rescheduled by ICC for World Cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
नादच खुळा! शुबमन गिलची वनडे रँकिंगमध्ये गरुडझेप, टॉप 5 फलंदाजांमध्ये एकटाच भारतीय
कुलदीपचा भीमपराक्रम! 3 विकेट्स घेताच मोडून टाकला चहलचा ‘हा’ मोठा Record, लगेच वाचा