अनेक क्रिकेटचे चाहते वेगनेगळे प्रयत्न करत खेळाडूंना भेटायला येत असतात . असाच एक 93 वर्षांचा चाहता किंग्ज इलाव्हन पंजाब विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज दरम्यानच्या सामन्यानंतर पंजाबचा मार्गदर्शक विरेंद्र सेहवागला भेटायला आला होता.
या चाहत्याचे नाव ओम प्रकाश असून या बद्दल स्वत: सेहवागने ट्विट करत माहीती दिली आहे. त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ” ओम प्रकाश जींना भेटुन खूप भावनिक वाटले. ते 93 वर्षांचे असून माझ्याबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी मला चंदीगढमध्ये पटीयालाहून भेटायला आले आहेत.”
Felt extremely touched on meeting Om Prakash ji, who is 93 years old and came from Patiala to meet me in Chandigarh and expressed his love for me. Dada ko Pranam. pic.twitter.com/8AHHqNl753
— Virender Sehwag (@virendersehwag) April 17, 2018
याचबरोबर किंग्ज इलाव्हन पंजाबनेही सेहवाग आणि ओम प्रकाशजींच्या भेटीचे फोटो ट्विटरवरून शेयर केले आहेत.
It was a special moment for @virendersehwag as he met Mr. Om Prakash, one of his oldest fans at 93 years old.
Both had a big smile on their faces all along 😄#LivePunjabiPlayPunjabi #KXIP #KingsXIPunjab #VIVOIPL pic.twitter.com/rsPjqdxPKq— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 18, 2018
आत्तापर्यंत पंजाबने यावर्षीच्या आयपीएलमध्ये तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. यात पंजाबने दिल्लीवर आणि चेन्नईवर विजय मिळवला आहे तर बेंगलार विरूद्ध पराभव स्विकारला आहे.