---Advertisement---

दुर्दैव! आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद होणारे ‘ते’ ५ कमनशिबी क्रिकेटर

---Advertisement---

आयपीएल २०२०चा दहावा सामना रॉयल चॅलेंजर बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. या सामन्यात मुंबईचा यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन हा ९९ धावांवर बाद झाला. याचबरोबर ९९ धावांवर बाद होणारा तो आयपीएलमधील केवळ पाचवा क्रिकेटर ठरला.

रॉयल चॅलेंजब बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्या डावात मुंबईकडून फलंदाजी करताना इशानने केवळ ५८ चेंडूत ९९ धावा केल्या. यात त्याने तब्बल ९ षटकार व २ चौकार मारले. परंतू त्याला आपले शतक पुर्ण करता आले नाही.

इशानपुर्वीही जे ४ खेळाडू ९९ धावांवर बाद झाले, त्यात सुरेश रैना, विराट कोहली, पृथ्वी शॉ व ख्रिस गेल यांचा समावेश आहे. सुरेश रैनावर व विराट कोहली २०१३मध्ये तर ख्रिस गेल व पृथ्वी शॉ २०१९मध्ये ९९ धावांवर बाद झाले होते.

आयपीएलमध्ये ९९ धावांवर बाद झालेले फलंदाज
-सुरेश रैना विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०१३
– विराट कोहली विरुद्ध दिल्ली डेअरडेविल्स, २०१३
-पृथ्वी शॉ विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २०१९
-ख्रिस गेल विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर, २०१९
-इशान किशन विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर, २०२०

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---