आयपीएलचा १३ वा हंगाम युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. यावेळी कोरोना विषाणूमुळे बदललेल्या परिस्थितीत आयपीएलचे आयोजन केले जाईल. खेळाडूंना बर्याच नवीन गोष्टींबरोबर जुळवून घ्यावे लागेल. या सर्व गोष्टी लक्षात घेत सर्व संघांनी आयपीएलची तयारी सुरू केली आहे.
आयपीएल २०२० युएईमध्ये होणार आहे. यावेळी आयपीएलच्या लिलावात अनेक नवीन परदेशी खेळाडूही खरेदी केले गेले. या खेळाडूंनी एकदाही आयपीएल सामना खेळलेला नाही. परंतु, यावेळी त्यांना अंतिम ११ जणांच्या संघात खेळण्याची संधी मिळू शकेल. जाणून घेऊया त्या ३ खेळडूंबद्दल जे यावेळी आयपीएलमध्ये पदार्पण करू शकतात.
हे ३ परदेशी खेळाडू आयपीएलमध्ये डेब्यू करू शकतात-
३. जोश हेजलवुड (Josh Hazelwood)
जोश हेजलवुडला सहसा टी-२० खेळाडू मानला जात नाही आणि त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याने जास्त टी२० सामने खेळले नाहीत. मोठ्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ बर्याचदा टी२० क्रिकेट खेळण्यापासून त्यांच्या गोलंदाजांचे संरक्षण करतो.
यापूर्वी जोश हेजलवुडला २०१४ च्या हंगामात मुंबई इंडियन्सने विकत घेतले होते पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. २०१५ मध्ये त्याने आयपीएलमधून माघार घेतली.
आता यावेळी तो आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग आहे. सीएसकेचा संघ त्याला लुंगी एन्गिडीसह मैदानात उतरू शकतो. जोश हेजलवुडच्या टी-२० कारकीर्दीवर नजर टाकली तर त्याने आतापर्यंत ३५ सामन्यांत ४२ विकेट घेतल्या आहेत.
चेन्नईने त्याला २ कोटीच्या रकमेवर खरेदी केले आणि जोश हेजलवुडला संधी मिळाली तर तो संधीचे सोने करू शकतो. सीएसकेसाठी जोश हेजलवुड खूप प्रभावी सिद्ध होऊ शकतो.
२. शेल्डन कॉटरल (Sheldon Cottrell)
वेस्ट इंडिजच्या खेळाडूंशिवाय आयपीएल अपूर्ण आहे. कॅरेबियन खेळाडूंनी त्यांच्या शैली आणि कामगिरीने संपूर्ण स्पर्धेचे आणि सामान्याचेही वातावरण बदलले. या हंगामाच्या लिलावात किंग्ज इलेव्हन पंजाबने शेल्डन कॉटरलचा त्यांच्या संघात समावेश केला आणि तो आयपीएलमध्ये पदार्पण करेल अशी शक्यता आहे.
शेल्डन कॉटरल उत्तम गोलंदाजी करतो आणि डेथ ओव्हर्समध्ये तो किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. आयपीएल दरम्यान शेल्डन कॉटरल उत्कृष्ट फॉर्ममध्ये असावा अशी अपेक्षा कर्णधार केएल राहुलनी केली आहे.
१. टॉम बंटन (Tom Banton)
देशांतर्गत क्रिकेटमधील जबरदस्त कामगिरीमुळे टॉम बंटन चर्चेत आला. २०१९ मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यातही त्याने पदार्पण केले होते. टॉम बंटनने बिग बॅश लीग आणि पाकिस्तान सुपर लीग खेळली आहे आणि आता तो आयपीएलच्या या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा भाग आहे.
टॉम बंटन हा एक जबरदस्त फलंदाज आहे. ख्रिस लिनला केकेआरने सोडले होते, त्यामुळे यावेळी लिनची जागा टॉम बंटनला घेता येईल आणि तो सलामीला फलंदाजी करताना दिसू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी हार्दिक पंड्यामुळे चूक नसतानाही बॅन झालेला क्रिकेटर म्हणतोय, प्लीज तुझ्या मुलाला भविष्यात…
अवघ्या ७० मिनिटांत ठोकले होते शतक, ९९ वर्षांपूर्वीचा विक्रम आजही अबाधित
‘ह्या’ बलाढ्य संघाविरुद्ध टीम इंडियाची ही महत्त्वाची मालिका पुढील वर्षापर्यंत स्थगित
ट्रेंडिंग लेख –
असे ५ खेळाडू जे आयपीएलच्या लिलावात ठरले महागडे, पण मैदनात मात्र झाले फ्लॉप…
५ असे खेळाडू ज्यांना आयपीएलच्या लिलावात मिळाली कमी रक्कम, परंतु संघासाठी ठरले मॅच विनर