वेस्ट इंडिजचा संघ पूर्वनियोजित वनडे मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला आहेे. या मालिकेतील तीनही वनडे सामने मुल्तान येथे खेेळले जाणार असून यातील दोन सामन्यात पाकिस्तान विजयी ठरला आहे. यामुळे पाकिस्तानचा संघ मालिकेत २-०ने पुढे आहे. शुक्रवारी (१० जून) झालेल्या सामन्यात पाकिस्तानने वेस्ट इंडिजला १२० या मोठ्या धाव फरकाने पराभूत केले आहे. या विजयाबरोबरच त्यांनी सहा देशांना मागे पाडत वेस्ट इंडिजविरुद्ध एक विक्रमही नोंदवला आहे
वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामने जिंकताच पाकिस्तान आयसीसी विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. यावेळी त्यांनी भारत, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, श्रीलंका आणि आयर्लंड या संघांना मागे टाकले आहे.
विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेत पाकिस्तानने १४ पैकी ८ सामने जिंकले असून ८० गुण मिळवले आहेत. तर सहा सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला. या यादीमध्ये दोनच संघांनी १००पेक्षा अधिक गुण मिळवले आहे. बांगलादेश १८ पैकी १२ सामने जिंकत १२० गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
या लीगमध्ये १३ संघांचा समावेश असून प्रत्येक संघाला २४ सामने खेळायचे आहेत. यातील पहिले आठ संघ २०२३मध्ये होणाऱ्या वनडे विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहेत. ही स्पर्धा भारतात होणार असून यजमान संघ आधीच याच्यासाठी पात्र ठरला आहे.
त्याचबरोबर पाकिस्तान संघ १९९१नंतर वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या द्विपक्षीय मालिकेत कधीही पराभूत झाला नाही. मागील ११ मालिकांचे निकाल पाहिले तर त्यातील १० मालिका पाकिस्तानने जिंकल्या आहेत. तर एक मालिका बरोबरीत राहिली होती. १९९१मध्ये पाकिस्तानचा संघ इमरान खान (Imran Khan) याच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज विरुद्ध २-०ने पराभूत झाला होता.
बाबर आझम याच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघाने याआधी दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला वनडे मालिकेत २-१ने पराभूत केले होते. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर ते ऑगस्ट महिन्यात नेदरलॅंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तेथे ते तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.
लीगमध्ये भारतील संघ सहाव्या स्थानावर आहे. त्यांनी १२ पैकी ८ सामने जिंकत ७९ गुण मिळवले आहे. त्यांना पेनल्टी बसल्याने एक गुण कमी करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा संघ १२ पैकी ७ सामने जिंकत ७० गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
पाकिस्तान कर्णधार, सलामीवीर, गोलंदाज म्हणजेच त्यांचा संपूर्ण संघ सध्या उत्तम कामगिरी करत आहे. आझमने तर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. वनडेत कर्णधार म्हणून सर्वोत्तम सरासरीने १००० धावा करत त्याने विराट कोहली, एबी डिविलियर्स, एमएस धोनी यांना मागे टाकले आहे. त्याची वनडेमध्ये कर्णधार म्हणून १००० धावा करताना सरासरी ९०.१६ एवढी आहे. त्याने ८८ वनडे सामन्यात १७ शतकेही ठोकली आहेत.
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा वनडे सामना रविवारी (१२ जून) खेळला जाणार आहे. टी२० मालिका ३-० अशी जिंकली असता पाकिस्तानचा संघ आता वनडे मालिकाही ३-०ने जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारा ख्रिस केर्न्स, राजासारखं जगूनही का झालीय त्याची दुर्दशा?
कुणी ‘आयएएस’, तर कुणी ‘आर्किटेक्चर’, वाचा किती शिकलेत तुमचे आवडते भारतीय क्रिकेटपटू
होऊदे खर्च! आयपीएल संपल्यानंतर आंद्रे रसेलने घेतली नवीन लग्जरी कार, किंमत माहितीय का?