इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा दिवसेंदिवस रोमांचक होत चालली आहे. या हंगामात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या युवा खेळाडूंनी गोलंदाजी करताना आपल्याच आवडत्या फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत आणि फलंदाजी करताना आवडत्या गोलंदाजाविरुद्ध चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. परंतु सामना झाल्यानंतर हेच युवा खेळाडू आपल्या आवडत्या खेळाडूचे स्वाक्षऱ्या बॅटवर किंवा जर्सीवर घेताना दिसून येत आहेत.असाच काहीसा प्रकार मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात गुरुवारी (२९ एप्रिल) झालेल्या सामन्यादरम्यान पाहायला मिळाला आहे.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉकच्या नाबाद ७० धावांच्या खेळीमुळे मुंबई इंडियन्स संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता.
तसेच हा सामना झाल्यानंतर राजस्थान रॉयल्स संघाचा युवा गोलंदाज चेतन सकारिया रोहित शर्मासोबत संवाद साधताना दिसून आला होता. त्यांनतर रोहित शर्माने चेतन सकारियाच्या जर्सी आणि टोपीवर स्वाक्षरी करत त्याला उत्कृष्ट भेट दिली. राजस्थान रॉयल्स संघाने हा अप्रतिम क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. हा फोटो राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शन म्हणून लिहिले आहे की, “त्याने प्रतिस्पर्ध्यासारखी गोलंदाजी केली आणि एखाद्या चाहत्यासारखा भेटला.”
Bowled to him like a rival, met him like a fan. 💗#HallaBol | #IPL2021 | @Sakariya55 | @ImRo45 | #MIvRR pic.twitter.com/hY4gThWDee
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2021
तसे रोहित शर्माने प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला ऑटोग्राफ केलेली जर्सी देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्स संघाचा वेगवान गोलंदाज आवेश खानला देखील ऑटोग्राफ केलेली जर्सी दिली होती.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने २० षटक अखे १७१ धावा केल्या होत्या. यामध्ये संजू सॅमसनने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली होती. तसेच जोस बटलरने ताबडतोड ४१ धावा केल्या होत्या. त्यांनतर दुसऱ्या डावात १७२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्स संघाकडून क्विंटन डी कॉकने सर्वाधिक ७० धावांची खेळी केली होती. तर कृणाल पंड्याने ३९ धावांचे योगदान दिले होते. हा सामना मुंबई इंडियन्स संघाने ७ गडी राखून आपल्या नावावर केला होता.
युवा चेतन सकारियाने या सामन्यात ३ षटक गोलंदाजी करत अवघ्या १८ धावा खर्च केल्या होत्या. परंतु त्याला एकही गडी बाद करण्यात यश आले नव्हते. तसेच रोहित शर्मा देखील या सामन्यात फ्लॉप ठरला होता. तो अवघ्या १४ धावा करत माघारी परतला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
Covid-19: राजस्थान रॉयल्सनंतर आता ‘या’ आयपीएल संघाने दिला मदतीचा हात, केली १.५ कोटींची मदत
केकेआरविरुद्ध ८२ धावा चोपणाऱ्या पृथ्वीची संघनायकाने केली प्रशंसा; म्हणाला, ‘तो धमाल करु शकतो, फक्त…’