उद्यापासून(3 ऑगस्ट) भारतीय संघाचा वेस्ट इंडीज दौरा सुरु होणार आहे. या दौऱ्यात 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने होणार आहेत. 5 आठवड्यांचा असणाऱ्या या दौऱ्याचा शेवट 3 सप्टेंबरला होईल.
भारताच्या या दौऱ्याची सुरुवात टी20 मालिकेने होईल. या मालिकेतील पहिला आणि दुसरा टी20 सामना अनुक्रमे 3 आणि 4 ऑगस्ट, असे सलग दोन दिवस उत्तर अमेरिकेतील फ्लोरिडा येथे खेळवला जाणार आहे.
त्यानंतर तिसरा टी20 सामना 6 ऑगस्टला गयाना येथे पार पडेल. तसेच गयाना येथेच 8 ऑगस्टपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. या वनडे मालिकेतील दुसरा आणि तिसरा वनडे सामना त्रिनिदादला अनुक्रमे 11 आणि 14 ऑगस्टला पार पडेल.
टी20 आणि वनडे मालिकानंतर विंडीज आणि भारत संघात 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असेल. या मालिकेतील पहिला सामना 22 ते 26 ऑगस्ट दरम्यान अँटीग्वाला होणार आहे. तर दुसरा सामना 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबरला जमैकाला होणार आहे.
असा असेल भारताचा विंडीज दौरा 2019 –
टी20 मालिका –
3 ऑगस्ट – पहिला टी20 सामना – फ्लोरीडा, रात्री 8 वाजता (भारतीय प्रमाणवेळे नुसार)
4 ऑगस्ट – दुसरा टी20 सामना – फ्लोरीडा, रात्री 8 वाजता (भारतीय प्रमाणवेळे नुसार)
6 ऑगस्ट – तिसरा टी20 सामना – गयाना, रात्री 8 वाजता (भारतीय प्रमाणवेळे नुसार)
वनडे मालिका –
8 ऑगस्ट – पहिला वनडे – गयाना, संध्याकाळी 7 वाजता (भारतीय प्रमाणवेळे नुसार)
11 ऑगस्ट – दुसरा वनडे – त्रिनिदाद, संध्याकाळी 7 वाजता (भारतीय प्रमाणवेळे नुसार)
14 ऑगस्ट – तिसरा वनडे – त्रिनिदाद, संध्याकाळी 7 वाजता (भारतीय प्रमाणवेळे नुसार)
कसोटी मालिका –
22 ते 26 ऑगस्ट – पहिली कसोटी – अँटीग्वा, संध्याकाळी 7 वाजता (भारतीय प्रमाणवेळे नुसार)
30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर – दुसरी कसोटी – जमैका, रात्री 8 वाजता (भारतीय प्रमाणवेळे नुसार)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विराट कोहलीच्या मदतीला धावून आला भारताचा हा दिग्गज कर्णधार
–काय सांगता! अंपायरने ऍशेसच्या पहिल्याच दिवशी दिले ७ चूकीचे निर्णय