इंग्लंड विरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा २-१ असा पराभव झाला.
या एकदिवसीय मालिका पराभवानंतर पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
इंग्लंड विरुद्धच्या टी-२० ंमालिकेत आणि एकदिवसीय मालिकेत भारताचे आघाडीचे फलंदाज वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
त्याचबरोबर माजी कर्णधार एमएस धोनी गेल्या एक वर्षापासून त्याच्या फलंदाजीच्या फॉर्मशी झगडत आहे. इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धोनी पूर्णपणे निष्प्रभ ठरला आहे. त्यामुळे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीच्या भारतीय संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
“मला माहित आहे की धोनी ग्रेट क्रिकेटपटू आहे. धोनीला २०१९ चा एकदिवसीय विश्वचषक खेळायचा असेल तर त्याच्या फलंदाजीत सुधारणा होणे आवश्यक आहे. धोनीकडे एकहाती सामना जिंकून देण्याच्या क्षमता आहे. मात्र गेल्या एक वर्षापासून धोनीला ते जमले नाही.” माजी कर्णधार गांगुली धोनीच्या फॉर्म विषयी चिंता व्यक्त करताना म्हणाला.
तसेच सौरव गांगुलीने भारताच्या तिसऱ्या सामन्यातील संघ निवडीवर जोरदार टिका केली. तिसऱ्या सामन्यासाठी फॉर्ममध्ये असलेल्या केएल राहुलला वगळून दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली होती.
“आज जर मी भारतीय संघाचा कर्णधार असतो तर डोळे बंद करुन केएल राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी दिली असती.” या शब्दात गांगुलीने राहुलची पाठराखण केली.
त्याचबरोबर संघ व्यवस्थापन केएल राहुल आणि अजिंक्य राहणेला योग्य संधी देत नसल्याचे भारताचा माजी कर्णधार म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
-सचिन तेंडुलकरची नवी इनिंग, इंग्लंडमध्ये सुरु केली क्रिकेट आकादमी
-विराट कोहलीने वनडे क्रमवारीत केला हा खास विक्रम