बॉलीवूडचा किंग शाहरूख खान केवळ सिनेमातीलच स्टार नाही, तर याबरोबरच तो एक यशस्वी व्यावसायिकदेखील आहे. शाहरूखने प्रॉडक्शन आणि अभिनयाबरोबरच क्रिकेट जगतातही आपला हात आजमावला आहे.
शाहरूख ३ क्रिकेट संघांचा मालक आहे. तसेच माध्यमांमध्ये अशा बातम्या येत आहेत की तो आता चौथ्या क्रिकेट संघातही गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. माध्यमांतील काही वृत्तानुसार, आयपीएल फ्रंचायझी कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) मालक शाहरूख खानला (Shahrukh Khan) इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ईसीबी) नवीन स्पर्धेतील ‘द हंड्रेड’मध्ये गुंतवणूक करायची आहे.
द टेलिग्राफ वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, “शाहरूखची मालकी असणारा केकेआर संघ १०० चेंडूंच्या सामन्याच्या या स्पर्धेत गुंतवणूक करण्यास तयार आहे. ही स्पर्धा यावर्षी जुलैमध्ये सुरु होणार होती. परंतु कोविड-१९या साथीच्या आजारामुळे ही स्पर्धा पुढील वर्षापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.”
द हंड्रेड लीगमध्ये (The Hundred League) ८ संघ भाग घेणार आहेत. प्रत्येक संघ आपल्या घरच्या मैदानात ४ सामने खेळणार आहे. लीग सामन्यांनंतर प्लेऑफ सामने होतील. त्यानंतर विजयी संघ घोषित केला जाईल. या लीगमध्ये प्रत्येक डावामध्ये १०० चेंडू फेकण्यात येतील. प्रत्येक १० चेंडूनंतर फलंदाज आपली जागा बदलतील. तसेच गोलंदाज सलग ५ किंवा १० चेंडू फेकू शकतात.
केकेआरच्या सहसंघमालकांची भागीदारी विंडीजमध्ये होणाऱ्या ‘कॅरेबियन प्रीमियर लीग’मधील त्रिबंगो नाईट रायडर्स या संघातदेखील आहे. केकेआरने २०१५मध्ये त्रिनिदाद फ्रंचायझी विकत घेतली होती. तसेच टी२० ग्लोबल लीगमधील केप टाउन या संघाची मालकीदेखील आहे. या संघाची फ्रंचायझी शाहरूखने २०१७मध्ये विकत घेतली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
-विराटने कितीही धावा करु द्या, सचिनचे हे विक्रम मोडणं जरा कठिणच
-शेवटच्या चेंडूवर ६ धावा हव्या असताना खणखणीत षटकार मारणारे २ खेळाडू
-१० मधल्या फळीतील असे फलंदाज, जे पुढे जाऊन बनले स्फोटक सलामीवीर