---Advertisement---

शेवटच्या चेंडूवर ६ धावा हव्या असताना खणखणीत षटकार मारणारे २ खेळाडू

On: रविवार, ऑगस्ट 16, 2020 12:24 PM
---Advertisement---

वनडे किंवा टी२० क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार मारणारे अनेक खेळाडू आहेत. अनेक खेळाडूंनी शेवटच्या चेंडूवर षटकार मारत संघाला विजय मिळवुन दिला आहे.

परंतु तुम्हाला माहित आहे का आंतरराष्ट्रीय सामन्यात शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना षटकार मारत संघाला विजय मिळवुन देणारे केवळ दोन खेळाडू आहेत.

विशेष म्हणजे एका खेळाडूने वनडेत तर दुसऱ्याने आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात हा कारनामा केला आहे.

२. स्टुअर्ट पाॅईंटर (टी२० सामना)

ओमान चौरंगी वनडे मालिकेत १७ फेब्रुवारी २०१९ रोजी आयर्लंडने नेदरलॅंड संघाचा १ विकेटने पराभव केला होता. हा सामना अनेक अर्थांनी रोमांचक ठरला होता.

या सामन्यात शेवटच्या चेंडूवर बरोबर ६ धावांची गरज होती. त्यात आय़र्लंड संघाची केवळ एकच विकेट बाकी होती. यावेळी आयर्लंडच्या स्टुअर्ट पाॅईंटर या खेळाडूने शेवटच्या चेंडूवर षटकार मारत हा विजय मिळवून दिला.

आयर्लंडला या सामन्यात शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी ११ धावांची गरज होती. पहिल्या दोन चेंडूवर ५ धावा घेतल्यावर तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर विकेट गेली. पाचवा चेंडू निर्धाव गेल्यानंतर सहाव्या चेंडूवर ६ धावांची गरज होती. तेव्हा स्टुअर्ट पाॅईंटर या खेळाडूने हा कारनामा केला होता.

पाॅल विन मिकेरेन हा गोलंदाज तेव्हा गोलंदाजी करत होता.

१. शिवनारायण चंद्रपाॅल (वनडे सामना)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सामन्यातील शेवटच्या चेंडूवर ६ धावा हव्या असताना षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू हा वेस्ट इंडीजचा शिवनारायण चंद्रपाॅल आहे.

२००८मध्ये श्रीलंका संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आला होता. त्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यांत शिवनारायण चंद्रपाॅलने शेवटच्या चेंडूवर ६ धावांची गरज असताना शानदार षटकार खेचला होता. विशेष म्हणजे तेव्हाही विंडीजने केवळ १ विकेटनेच विजय मिळवला.

शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. पहिला चेंडू निर्धाव टाकल्यानंतर पुढील तीन चेंडूवर ३ धावा निघाल्या. शेवटच्या दोन चेंडूंवर १० धावांची गरज असताना पाचव्या चेंडूवर चौकार तर सहाव्या चेंडूवर चंद्रपाॅलने षटकार खेचत वेस्ट इंडिजला शानदार विजय मिळवुन दिला होता.

तेव्हा चंद्रपाॅलसमोर जबरदस्त फाॅर्ममध्ये असलेला चामिंडा वास गोलंदाजी करत होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

२००० सालापुर्वी पदार्पण केलेले हे ५ खेळाडू विश्वचषकानंतर घेऊ शकतात निवृत्ती

२०१९ विश्वचषकानंतर निवृत्त होणाऱ्या ख्रिस गेलबद्दल कधी न ऐकलेल्या १० गोष्टी

केएल राहुलची निवड करताना अजिंक्य रहाणेवर अन्याय? वाचा

टीम इंडियाची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे १५ जणांचा चमू

पंतचा समावेश योग्य का? धोनी, कार्तिक व पंतची गेल्या एक वर्षातील कामगिरी पहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment