सोमवार, 2 जुलैला विंम्बडनच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात गतविजेता रॉजर फेडररने सामन्याबरोबरच त्याच्या एका कृतीने करोडो चाहत्यांची मने जिंकली.
सर्बियाच्या दुसान लोजोविकवर फेडररने 6-1, 6-3, 6-4 असा विजय मिळवला.
या विजयानंतर मैदानावरील चाहत्यांना स्वाक्षरी देताना एका भारतीय चाहतीने फेडररला एक फलक दाखवत त्याच्या हेअर बॅन्डची मागणी केली.
“रॉजर प्लिज मला तुझे हेअर बॅन्ड मिळेल का!!!” असा फलक त्या चाहतीच्या हातात होता.
आपल्या चाहतीच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत फेडररने त्याच्या बॅगमधील एक हेअर बॅन्ड तीला दिला.
फेडररच्या या कृतीचा सर्व टेनिस प्रेमींना आनंद झालाच पण यावेळी त्या युवा चाहतीच्या चेहऱ्यावर आनंद मात्र मावत नव्हता.
यानंतर फेडररच्या चाहतीच्या वडीलांनी ट्विटरवर आनंद व्यक्त केला.
Ask and you shall receive… 🤗#Wimbledon @rogerfederer pic.twitter.com/QaEVpNqenB
— Wimbledon (@Wimbledon) July 2, 2018
That was my daughter who received the headband. She is a MASSIVE fed fan and is absolutely thrilled. Thank you @rogerfederer. She will never forget this moment for the rest of her life. #goat #federer https://t.co/N1Az6oZAS5
— Abhijeet Joshi (@abhijeet_joshi) July 2, 2018
त्याचबरोबर फेडररच्या या कृतीचे अनेकांनी कौतूक केले.
Roger Federer makes young fan's dream come true on first day at Wimbledon by handing over headband https://t.co/Iqhs5hC9pS pic.twitter.com/vTWrC31ReW
— Siglov Freudivan (@DerangedRadio) July 2, 2018
What a gent is @rogerfederer finding a headband for that little girl.
— Sonia Russell (@soniarussell195) July 2, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-कुलदीप यादव काही ऐकेना! केला असा कारनामा की इंग्लंडचे फलंदाज फक्त पहात…
-भारतीय महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर अडकली मोठ्या वादात