टी२० विश्वचषकातील बहुप्रतिक्षित सामना भारत आणि पाकिस्तान या संघांदरम्यान खेळला गेला. दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने भारतावर १० गड्यांनी मोठा विजय मिळवला. यासह पाकिस्तानने विश्वचषकात भारताविरुद्ध कधीही विजय न मिळवण्याची साखळी खंडित केली. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारतीय संघावर चांगलीच टीका होत आहे. त्याचवेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नेतृत्व सोडावे असा सूर काही चाहत्यांनी सोशल मीडियावरून धरला.
सोशल मीडियावर सुरू झाला ट्रेंड
भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली याच्या विरोधात ट्विटरवर काही चाहत्यांनी ‘विराट कोहली कप्तानी छोडो’ असा ट्रेंड सुरू केला. सामन्यानंतर विराटने पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवान याला मिठी मारली होती. ते छायाचित्र शेअर करत एका चाहत्याने लिहिले, ‘अशावेळी तुझे हास्य कोणीही मान्य करणार नाही’
.@imVkohli this smile is unacceptable at this moment.😡#विराट_कोहली_कप्तानी_छोड़ो pic.twitter.com/WkunpJj6R3
— ऋषि राजपूत 🇮🇳 (मोदी का परिवार) (@Rishi_Bharatiya) October 24, 2021
अन्य एका चाहत्याने लिहिले,
‘नजीकच्या काळात आपण ९ सैनिक आणि २ जेसिओ गमावले आहेत. आपण सामना हरलो हे ठीक आहे मात्र विराटने विरोधी संघाच्या खेळाडूंसोबत असे सेलिब्रेशन करायला नको होते.’
Recent days We have lost 9 Indian soldiers and 2 JCOS, it's okay India lost a match but it's not okay virat kohli celebrated with Pakistani crickets #विराट_कोहली_कप्तानी_छोड़ो pic.twitter.com/ASdU9yIBKj
— अरविंद तिवारीshkti prabhari BJP GOVN( India walle) (@IndiandonArwind) October 25, 2021
काही चाहत्यांनी या सामन्यानंतर विराट कोहलीवरील अनेक मजेदार मीम शेअर केले. तसेच या सामन्यात भारतीय संघाला माजी कर्णधार एमएस धोनीची उणीव जाणवल्याचे देखील म्हटले.
Indian team after losing Big match🥺#RohithSharma #ViratKohli #indiaVsPakistan #ICCT20WorldCup2021 #विराट_कोहली_कप्तानी_छोड़ो #OverConfidence #MaukaMauka #IndianCricketTeam #BCCI #पनौती 💥 pic.twitter.com/tXDumRF8JD
— SKY BHAIYAA 🇮🇳 (@iamsky2211) October 25, 2021
Badly missing Dhoni in this type of conditions #MentorDhoni ❤️❣️
But guys plz Stop doing this Trend on twitter like#विराट_कोहली_कप्तानी_छोड़ो
#पनौती
for Virat he is also good in captaincy but not like Ms Dhoni 😅 pic.twitter.com/LR7Jh8kTlH— Sarthak Nageshwar (@SarthakNageshw7) October 24, 2021
सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव
या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा व केएल राहुल हे दोन्ही सलामीवीर अनुक्रमे ० व ३ धावा काढून माघारी परतले. विराट कोहलीच्या ५७ व रिषभ पंतच्या ३९ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांच्या अखेरीस १५१ भावा उभारल्या. पाकिस्तानसाठी कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी नाबाद अर्धशतके झळकावत पाकिस्तानला १८ षटकांमध्ये १० गड्यांनी सामना जिंकून दिला. तीन बळी मिळवणारा शाहीन आफ्रिदी सामनावीर ठरला.
महत्त्वाच्या बातम्या-
याला म्हणतात आदर! इतिहास रचल्यानंतर हात बांधून मेन्टॉर धोनीपुढे उभे राहिले पाकिस्तानचे खेळाडू- VIDEO
‘विराट’ मनाचा कोहली; पराभवानंतरही स्वत: विरोधक आझम, रिझवानला गाठलं आणि मारली मिठी