भारत-इंग्लंड यांच्यात मंगळवारी (17 जुलै) निर्णायक तिसरा एकदिवसीय सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने ट्विटरवरुन एक जुना व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओ बरोबर विराटने भावनिक ट्विट करत भारतीय चाहत्यांचे आभार मानले.
विराटने शेअर केलेल्या व्हीडीओमध्ये भारतीय चाहते सामन्यापूर्वी खेळाडूंबरोबर मैदानात राष्ट्रगीत गाताना दिसत आहे.
One of the best feelings watching this video! Thank you everyone for your constant and unconditional support for us. Your cheers and love motivates us to keep trying harder every time! 🇮🇳🙏😇 pic.twitter.com/WLxSnyfmVZ
— Virat Kohli (@imVkohli) July 16, 2018
“हा व्हीडीओ पाहून मला सर्वोच्च आनंद झाला. तुमच्या सततच्या पाठिंब्यासाठी मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. तुमचे प्रेम आणि पाठिंबा आम्हाला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरीत करतो.” या शब्दात विराटने भारतीय चाहत्यांचे ट्विटर वरुन आभार मानले.
मंगळवारी लिड्स येथील हेडिंग्ले क्रिकेट मैदानावर भारत-इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना होणार आहे.
या मालिकेत भारताने पहिला सामना जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारत बरोबरी साधली होती.
1-1 अशा बरोबरीत असलेल्या एकदिवसीय मालिकेतील निर्णायक तिसरा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघात जोरदार लढत होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-कुलदीप यादवला निष्प्रभ ठरवण्यासाठी आम्ही सज्ज- मार्क वुड
-वनडे मालिका विजयासाठी भारत आणि इंग्लंडमध्ये रंगणाऱ्या निर्णायक सामन्याविषयी सर्वकाही…