वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिज संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा ४-१ ने धुव्वा उडवला होता. आता या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिज संघाला पराभूत केले होते. मात्र दुसऱ्या वनडे सामन्यात एकही चेंडूचा खेळ न होता हा सामना रद्द करण्यात आला आहे.(Australia vs West Indies 2nd odi suspended due to Covid 19 case after toss)
नाणेफेक झाल्यानंतर आढळला कोरोना पॉसिटीव्ह
वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या वनडे मालिकेतील दुसरा वनडे सामना चालू होण्यापूर्वीच हा सामना रद्द करण्यात आला आहे. गुरुवारी (२२ जुलै) हा सामना होणार होता. पण या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात नाणेफेक झाल्यानंतर पहिला चेंडू टाकण्यापूर्वीच वेस्ट इंडिज संघातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला, ज्यामुळे त्वरित हा सामना रद्द करण्यात आला.
रद्द झाला वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना
कडक बायो बबलनंतरही कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने या संपूर्ण मालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या मालिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वेस्ट इंडिज संघाविरुद्ध वनडे मालिका झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघ बांगलादेश दौऱ्यावर रवाना होणार होता. परंतु अशी परिस्थिती पाहता, या दौऱ्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
The 2nd ODI between West Indies and Australia has been suspended with immediate effect due to a positive COVID-19 case.
All personnel inside the bubble will be placed into isolation.#WIvAUS pic.twitter.com/Zk5LAiZ3Gy
— ICC (@ICC) July 22, 2021
कोणता खेळाडू आढळला कोरोना पॉझिटीव्ह?
मात्र या सामन्यात नक्की कोणता खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे याबाबत अद्याप कुठलाही खुलासा केला नाही. परंतु ही ऑस्ट्रेलियन संघातील वेगवान गोलंदाज मेरेडिथसाठी धक्कादायक बाब आहे. कारण सामना सुरू होण्यापूर्वीच मेरेडिथ वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु सामना सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्याची वेळ आली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ १-० ने आघाडीवर आहे.
महत्वाच्या बातम्या-
मॅच विनर खेळाडूची प्रशिक्षक द्रविडबद्दल मोठी प्रतिक्रिया; म्हणे, ‘ते भारताचे गुंडे आहेत’
टी२० सामन्याच्या शेवटच्या षटकांत मिलरने ‘इतके’ षटकार ठोकत केला विश्वविक्रम, धोनीलाही टाकले मागे
विराटसेनेला दुखापतींनी घेरले, बीसीसीआय नवख्या खेळाडूंना करणार इंग्लंडला रवाना?